कृष्ण प्रकाश उत्तर द्या...!
नवऱ्याने केस कापले, मारहाण केली. याची तक्रार द्यायला गेलेल्या मुलीची तक्रार घेण्याऐवजी सहकाऱ्यांच्या वाढदिवसात व्यस्त... तक्रार घेण्यासाठी काही तास लागले. अशा व्यवस्थेकडून न्याय कसा मिळणार? सक्षम अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या कार्यक्षेत्रात घडलेला प्रकार... पत्रकार गोविंद वाकडे यांनी मांडलेली हकीकत...
गोविंद वाकडे
(नव-याने माझे केस कापले, मारहाण केली हे सांगायला पोलिसांकडे गेले तर पोलीस आपल्या सहकार्याचा वाढदिवस साजरा करण्यात मश्गुल होते. हीच घटना कुण्या मोठ्या बापाच्या पोरी सोबत घडली असती तर माध्यमांपासून सगळ्याचं यंत्रणांनी प्रकरण गंभीरपणे हाताळले असतं पण......)
बातम्या करतांना भावनांना आवर घालावी लागते. मात्र, आज ही बातमी करत असतांना अपराधी पणाची भावना दाटून आलेली. कारण प्रत्येक वेळा सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणत तोंडभरून कौतुक करणाऱ्या आपल्या खमके अधिकारी अशी ओळख असलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पोलीस दलातील अधिकारी एव्हढे असंवेदनशील असू शकतात...? यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, घटनेतील पीडितेने कथन केलेली सगळी हकीकत घडली होती..
कोमल वाल्हेकर, 12 वी पास हुशार तरुणी पण जन्मत:च सटवाईने तिच्या भाळी अष्टदरिद्री गोंदली असावी, बालपण झोपडपट्टीत गेलं आणि तारुण्यही...
मात्र, तिच्या प्रवासात तिला एक साथीदार मिळाला आणि तिच्या जगण्याच्या आशा पल्लवित झाल्या, ती मोठी स्वप्न पाहू लागली. मात्र, नियतीलाही मान्य नव्हतं. ज्याच्यावर प्रेम केलं तो गुन्हेगारी क्षेत्रात रमू लागला, सगळी व्यसनं जडली आणि अमृता उर्फ कोमल त्याला दुय्यम वाटू लागली.
सगळा वाद विकोपाला गेला…
मात्र, त्या नंतरही कोमल ने धीर सोडला नाही. त्याच्याशी लग्न केलं, काही दिवसाने त्यांच्या जीवनात एक चिमुकली आली. तिच्या हसन्यानं कोमल पुन्हा संसारात व्यस्त झाली.
मात्र नवरा काही सुधारायच नावं घेत नव्हता…
पुन्हा भाडणं होऊ लागली, शेवटी कोमल पती आणि पोटच्या गोळ्यापासून विभक्त झाली आणि आईकडे राहू लागली.
मात्र काल 2 वर्षा नंतर नराधम नव-याने तिला एकटीला गाठलं आणि घरी नेऊन बेदम मारहाण करत तिचे सुंदर केस कापले...
आत्ता पर्यंत जो काही अत्याचार सहन केला होता. त्या सगळ्यांची परिसीमा गाठणारं हे कृत्य कोमल सोबत घडलं होतं, मात्र सांगणार तरी कुणाला....?
कोमल कशी बशी त्याच्या तावडीतून पळाली. आणि थेट पोलिसांकडे गेली तेव्हा पोलीस आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यात व्यस्त होते. आणि त्यामध्ये असलेली एक महिला पोलीस अधिकारी आपलं म्हणणं एकूण घेण्याऐवजी आपली खिल्ली उडवत होती. असं सांगतांना कोमलचे डोळे भरून आले होते.
3-4 तास वाट बघितल्यानंतर ती पोलीस चौकीतुन उठली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेली तेव्हा तिला पोलिसांनी दाद दिली तक्रार नोंदवली गेली...
मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता, कारण कोमल आतून पुरती कोसळली होती
गरीब घरात जन्म घेणं? दलित जातीत जन्म घेणं,? मोठी स्वप्नं पाहणं? की प्रेम करणं?
नेमका आपण काय गुन्हा केला होता हेच तिला कळत नाहीय.
आपल्या कापलेल्या केसांसारखं निगरगट्ट समाजाशी असलेलं आपलं नातंही कापून टाकावं आणि बोडखं व्हावं असं तिला वाटतं असावं.... आणि न्याय मिळालाच नाही तर ती तसंही करेल....!!
(हा प्रकार गृहकलहातुन घडला असला तरी अत्यन्त विकृत आहे आणि असं कृत्य करणाऱ्यांना कायद्याची भीती तर असायलाच हवी, अन्यथा कोमलने उपस्थितीत केलेल्या प्रश्नांची उत्तरं देतांना समाज म्हणून शरमेने मान झुकविण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल)
-कोमल ला टाळणारे पोलीस अधिकारी कर्मचारी कोण?
-पोलीस स्टेशन मध्ये खरंच कुणाचा वाढदिवस साजरा केल्या जात होता याचे cctv बघितले जातील का?
-कोमलला अमानुष वागणूक देणारा नराधमला अटक करून-कायद्याची जरब बसवतील का?
या प्रश्नःची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील मिस्टर ips कृष्ण प्रकाश सर...
-गोविंद अ. वाकडे