लोकप्रतिनिधी मग तो कोणत्याही जाती धर्माचा, विचारसरणीचा असो. एकदा निवडणूक आला की तो आम जनतेची मालमत्ता असतो.मालमत्ता हा शब्दप्रयोग काही जणांना नक्कीच खटकले पण हो अगदी तसेच असते अगदी त्याचे वैयक्तिक आयुष्य पण सार्वजनिकच असते.तो काय करतो,कसा वागतो,कसा रहातो अगदी सगळ्या गोष्टींचे स्रिनिग होते आणि म्हणूनच सदा सर्वदा जनतेच्या गळ्यातला ताईत बनून रहाणं येरागबाळ्याचे काम नाही.सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी मतदान केले म्हणून आपण निवडून येतो अशा वेळी ते सगळे आपसा आपसात गुण्यागोविंदाने रहातील ही जबाबदारी नेत्यांची असते.प्रत्येक नेत्याची एखादी वेगळी खुबी असते."लै जबरदस्त बोलतो राव.."लै काम करतो..".लै गोडबोल्या आहे.." इ. इ. लोक आपल्याला आवडणारा एखाद्या गुण नेत्यात बघतात आणि त्याचे फॅन होतात.कधी भ्रमनिरास मग परिवर्तन असं चक्र चालूच रहाते
मला आठवतंय १९९१साल असावं मी डॉक्टर शैलेश शहां कडे प्रॅक्टिस करत होते आज OPD संपली की होम व्हीजीट आहे.आणि सर मला भुजबळ फार्म हाऊस ला घेऊन आले तुमच्या आईं च्या ट्रीटमेंट साठी.सर मला म्हणाले Mumbai चे महापौर होते जबरदस्त डेअरिंग बाज.मग आमच्य अकलूज च्या बोरावके, गिरमे,पांढरे,शिवरकर सगळ्याच परिवारांनी तुमच्या बद्दल सांगीतले माझं सगळं लहानपणच या परिवारात गेलेले अगदी आजही घट्ट नाळ जुळलेली म्हणजे अगदी आज तुम्ही मराठा/ OBC अशी सुरी चालवीली तरी तुमच्या हाताला रक्त लागेल पण तरीही ती नाळ नाहीच तुटणार..असो
तुम्ही शिवसेना सोडली तुमचा नंतर पराभव ही झाला.कॉंग्रेस मध्ये तुम्ही आलात .मी अपघाताने राजकारणात आले.तुमचे वाढणारे प्रस्थ ..असेच शरद पवार साहेबां कडे बसलो होतो कोणीतरी तुमची कागाळी केली.." डॅशिंग आहे अशी माणसे संभाळलीच पाहीजेत.मी भूजबळांना अंतर देणार नाही.जातपात मला शिकवायचे नाही पवार साहेबां नी एक घाव दोन तुकडे केले विषय तिथेच संपवला... तुम्ही लढत राहीलात..यार काय जबरदस्त बोलतो हा माणूस..तुम्ही मंत्री होतात मी सावित्री बाईंच्या नावाने एक सभागृह बांधले भूजबळ साहेबांना बोलवायचे पण तुमच्या आजूबाजूचे काही जमून देईनात डायरेक्ट तुम्हाला फोन लावला तुम्ही कार्यक्रमाला आलात.. समीर/ तुमच्या निवडणूका आल्या.तुम्ही निवडणुकींचा बाजच बदलललात अगदी जो जे वांछील तो ते लाहो..आम्ही अगदी रात्रंदिवस तुमचे काम केले अगदी माळी/ मराठा काही काही डोक्यात आले नाही पण तुमच्या डोक्यात तिडीक होतीच.ज्या महात्मा फुल्यांचे आपण नाव घेतो त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कधीच हा माझा तो तुझा असं केले नाही.प्रत्येक कार्यक्रमात ज्या आंबेडकरांना आपण हार घालतो ते बाबासाहेब कुणब्याच्या आरक्षणा साठी आणि हिंदू कोड बिल मधून महिलांच्या हक्कांसाठी आग्रही होते हे दोन्ही ही नेते पूर्ण आयुष्य भर दलीत/ माळी कार्ड नाही खेळले म्हणून अजरामर झाले पण तुम्ही त्यांचे ही नाही झाले तर तुमच्या साठी प्रसंगी अजित पवारांना माघार घ्यायला लावणार्या पवारांचे तुम्ही कसे होणार? किरीट सोमय्या टेप घेऊन तुमच्या स्विमिंग पूल ची खोली मोजण्यासाठी आला होता तेंव्हा मराठा असून त्याची कॉलर पकडायला मी गेले होते पण जेंव्हा शेवटच्या क्षणी मला पक्षाने विधानसभा लढवायचे आदेश दिले तेंव्हा आघाडी धर्म म्हणुन मी तुमच्या घरी आले तेंव्हा सगळ्या समक्ष समीर भुजबळांनी माझी लायकी काढली आणि माझ्या जातीची तिडीक तुमच्या डोक्यात असल्याने तुम्ही माझ्या प्रचारातुन कार्यकर्त्यांना बोलवून घेतले.तुमचा विरोध जरंगेंच्या मागणीला आहे असे मान्य करू की त्यांनी ही मागणी अवास्तव केली आहे पण तुम्ही तर मंत्रीमंडळात आहात. मुख्यमंत्र्यां कडे जा ती मागणी कशी चूकाची आहे ते सांगा ते नसतील ऐकत तर सत्तेवर लाथ मारा यात जरंगे कडे पैसे कसे आले? ते सासऱ्याचे खातात की आणखी कुणाचे याचा संबंध कुठे आला?तुम्ही सत्तेत ही आहात ती सोडायची तुमची तयारी नाही.समाजा मध्ये सामंजस्य निर्माण करणे तुमची जबाबदारी आहे ते राहीले बाजूला उलट सत्तेत राहून सत्तेचे सगळे लाभ घेऊन जो मराठा/ OBC विखार तुम्ही सुरू केला आहे यात तुम्ही कोणाचा फायदा करताय ते तुम्हालाच माहित पण कमीत कमी समता परिषदेचे नाव बदलून विषमता परिषद तर ठेवा.ज्या माळी समाजाच्या नावा खाली हे सगळं चाललंय त्यांना ही हे आता सहन होत नसेल कारण पिढ्यानपिढ्या या समाजाने अपार कष्ट उपसलेय यांच्या रक्तातच कोणाचा द्वेष नाही तुम्ही कशाला त्यांचा रक्तगट बदलताय? कोणा मराठ्या ला OBC चा तिरस्कार करायचा नाही की कोणा OBC मराठा खुपत नाही फक्त तुम्ही आग लावणे बंद करा त्या पपेट शो मध्ये भावल्या नाचतात पण नाचवणारा वेगळा असतो तुमचा पपेट झालाय एकदिवस नाचवणारा खेळ बंद करेल आणि मग तुमचा खेळ होईल
तुर्तास इतकेच