महाराष्ट्र सरकारची खास गरोदर महिलांसाठी हि योजना आहे,कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?
१) अनुसूचित जमाती क्षेत्र असलेल्या 16 जिल्ह्यातील गरोदर स्त्रियांसाठी
2) अनुसूचित जमाती क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर महिला आणि स्तनदा माता यांना नजीकच्या अंगणवाडी मधून एक वेळचे पोषण आहार दिले जाते.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
१) रेशन कार्ड
2) आधार कार्ड
3) गरोदर अथवा स्तनदा माता असल्याची नजीकच्या अंगणवाडीमध्ये नोंदणी करणे आवश्यक.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगणवाडी सेविकाेकडे अर्ज करावा लागेल.