लस घेतली आणि काही वेळातच 23 जणांचा मृत्यू; चौकशीचे आदेश

Update: 2021-01-16 03:30 GMT

लसींनंतर करोनाचा विळखा कमी होणार असल्याची आशा सर्वत्र आहे मात्र नॉर्वेतून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लसीकरणानंतर काही वेळातच २३ वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकजण आजारी पडले आहेत. या घटनेमुळे नॉर्वेची डोकेदुखी वाढवली असून, सरकारने या घटनांची चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

द ब्लूमबर्गने याविषयीची वृत्त दिलं आहे. नॉर्वेत लसीकरण सुरू असून, लस घेतल्यानंतर काही वृद्ध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. फायझर-बायोएनटेक लस घेतल्यानंतर २३ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेकजण आजारीही पडले आहेत. नॉर्वे डॉक्टरांनी या मृत्यूचा तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्ती ८० वर्षांपेक्षा जास्त आहेत. त्यांच्यामध्ये लस घेतल्यानंतर दुष्परिणाम दिसून आले आहेत, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कोरोना लस दिल्यानंतर आपल्या देशातील 23 जणांचा मृत्यू झाला असा दावा युरोपातील नॉर्वे या देशानं केला आहे. नॉर्वेमध्ये आजवर 33 हजार जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. या लसीकरणांनंतर मृत्यूमुखी पावलेल्या व्यक्तींमध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे. यामध्ये अनेकांचं वय हे 80 पेक्षा अधिक आहे.

'कोरोना लस वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरु शकते' असा इशारा नॉर्वे सरकारनं दिला आहे. यामध्ये मृत्यूमुखी पावलेल्या 23 पैकी 13 जणांचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या शरिरावर लशीचे दुष्परिणाम झाल्याचं आढळून आलं आहे.

'गंभीर आजारी लोकांसाठी लशीकरणानंतरचे सामान्य साईड इफेक्टही धोकादायक ठरु शकतात. ज्यांचं आयुष्य अगदी थोडं उरलं आहे, त्यांना या लशीचा कमी फायदा मिळू शकतो,'' असा दावा नॉर्वेजियन इंस्टीट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेनं केला आहे.

Tags:    

Similar News