कोरोना लस घेतल्यामुळे उत्तर प्रदेशात वॉर्डबॉयचा मृत्यू? कुटुंबियांचा गंभीर आरोप

Update: 2021-01-18 05:30 GMT

कोरोना प्रतिबंधक लस उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका ४५ वर्षीय वॉर्डबॉयने घेतल्यानंतर त्याचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्याचा मृत्य लस घेतल्यामुळेच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे अद्याप अधिकृतरित्या समोर आलेले नाही.

नेमकं काय घडलं?

१६ जानेवारी रोजी कोविड लसीकरण मोहिमेंतर्गत महिमेंतर्गत जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या ४८ वर्षीय महिपाल सिंह यांनादेखील करोना लशीचा डोस देण्यात आला होता. रविवारी सायंकाळी घरी असताना महिपाल यांची तब्येत बिघडली. नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

दरम्यान, यासंदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे.

Tags:    

Similar News