कोरोनाचा कहर संपूर्ण देशात वाढलेला असताना सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 47 हजार 190 वर पोहोचली आहे. तर राज्यातील मृतांची संख्या 1 हजार 577 वर पोहोचली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत असून ही संख्या आता 28 हजार 817 वर पोहोचली आहे. मुंबईतील मृतांचा आकडा 949 झाला आहे. राज्यात आतापर्यंत 13 हजार 404 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईतही सहा हजारांच्यावर रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईनंतर सर्वाधिक रुग्ण हे ठाणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 6 हजार 130 झाली आहे तर आतापर्यंत 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता 5 हजारांच्यावर गेली आहे.