राज्यात ६ हजार १२६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद, बरे होणाऱ्यांची संख्या अधिक...
काल बुधवारी राज्यात नवीन ६ हजार १२६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०७ हजार ४३६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून दिवसभरात १७७ कोरणा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या सध्या कमी होताना दिसत आहे. सोमवार पासून राज्यातील अनेक ठिकाणचे निर्बंध राज्य सरकार कडून शिथिल करण्यात आले. त्यानंतर काल बुधवारी राज्यात नवीन ६ हजार १२६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ०७ हजार ४३६ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिवसभरात १७७ कोरणा रुग्णांचा मृत्यू झाला असून. आजपर्यंत एकूण ६१ लाख १७ हजार ५६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एकंदरीतच सध्या राज्यातील बरे होण्याचे प्रमाण हे 97 टक्के एवढे आहे.
सध्या दुसरी लाट कमी होताना दिसत असून सद्याची परिस्थिती पाहता सोमवार पासून राज्यात ११ जिल्हे सोडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दुसरी लाट ओसरत असली तरी देखील अजूनही राज्यात ठराविक ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.