करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली 10,127 पदे तातडीनं भरली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्य सेवकांची तसेच कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागाशी संबधीत असलेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, या पाच संवर्गातील 10,127 पद रिक्त आहेत. यातील 50 टक्के पद भरण्याचे वित्त विभागाने मान्यता दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषदेची 10 हजार 127 सर्व रिक्त असलेली पद भरण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवला आहे. वित्त मंत्रालयाने मान्यता दिल्यास तातडीने पद भरली जाणार आहेत.