मराठा आरक्षणाचं नेतृत्व महिलांनी केलं होतं. त्यामुळं मराठा समाजाचे हे मोर्चे अभूतपूर्व असे निघाले होते. मराठा क्रांती मोर्चांनी अांदोलनांचा एक आदर्शच उभा केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता मात्र आज या मागणीला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे त्या मुलींच्या योगदानाला न्याय मिळालेला आहे असं भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी मॅक्स वुमन शी बोलताना सांगितले आहे