महावितरणमध्ये पुरूषांची मक्तेदारी आजही पाहायला मिळते. त्यातही उच्चपदांवर महिला अधिकाऱ्यांचं प्रमाण तसं कमीच. चंद्रपूरसारख्या जिल्ह्यात पोस्टिंग म्हणजे काही अधिकाऱ्यांना शिक्षा वाटते. मात्र, अर्चना घोडेस्वार यांनी चंद्रपूर महावितरणच्या कार्यकारी अभियंता म्हणून पदभार स्विकारला आणि महावितरणच्या कामात सुसूत्रता आणून अनेक अभिनव उपक्रम राबवायला सुरूवात केलीय. त्यातून महावितरणच्या कोट्यवधी रूपयांची बचतही झाली. महावितरणच्या कामात कशी आणली सुसूत्रता? जाणून घेऊयात अर्चना घोडेस्वार यांच्याकडून...