चेहऱ्यावर एकही डाग राहणार नाही, टोमॅटोचा वापर करून मिळवा सुंदर आणि ब्राइट त्वचा!
थंडीमध्ये स्किन डल आणि ड्राय होऊ शकते, पण टोमॅटोचा वापर करून तुम्ही तुमच्या स्किनला ब्राइट आणि ताजेतवाने करू शकता. टोमॅटो मध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन C असतात, जे त्वचेला चमकदार बनवतात आणि नैसर्गिक रंग परत आणतात. चला, एकदम सोपी टोमॅटोच्या फेशियलची पद्धत जाणून घेऊयात...
टोमॅटो फेशियल कसं करायचं?
1. टोमॅटोची पल्प तयार करा :
एक ताजं टोमॅटो घ्या आणि त्याची पल्प तयार करा. टोमॅटो कापून त्याची बारीक पेस्ट करा.
2. स्किनवर लावा :
या पेस्टला थोडं हलक्या हाताने तुमच्या चेहऱ्यावर लावा. विशेषतः त्या भागांवर जरा जास्त लावा जिथे त्वचा जास्त ड्राय किंवा डल आहे.
3. 5-10 मिनिटांसाठी ठेवा :
टोमॅटोच्या पल्पला तुमच्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटांसाठी ठेवा. टोमॅटोचा रस त्वचेमध्ये प्रवेश करून त्वचेचे पोषण करतो आणि चमक देतो.
4. हलक्या मसाजसाठी वापरा :
टोमॅटोच्या पेस्टचा वापर हलक्या मसाजसाठी करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल आणि त्वचा अधिक ताज्या दिसेल.
5. पाण्याने चेहरा धुवा :
10 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा
दररोज किंवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे फेशियल करा, त्यामुळे तुमच्या त्वचेला नैसर्गिक ब्राइटनेस आणि हायड्रेशन मिळेल. टोमॅटोमध्ये असलेली लाइकोपीन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सुरक्षित ठेवून त्याला चमकदार बनवतात. हे नैसर्गिक फेशियल घरच्या घरी आणि कोणत्याही खर्चाशिवाय तुमच्या स्किनसाठी एकदम योग्य आहे.