"जुनीच जादू नव्या प्रेमासह.. फक्त तुमच्यासाठी"
अमृता फडणवीस यांनी शेअर केला गुलाबी ड्रेसमधील खास फोटो;
अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. मग ते कधी राजकीय पोस्टमुळं तर कधी नवीन गाणं किंवा हटके लूक असेल. 'व्हॅलेंटाईन वीक'साठी अमृता फडणवीस यांनी असाच एक शेअर केला असून त्याला 'लवकरच सादर करत आहोत...जुनीच जादू नव्या प्रेमासह.. फक्त तुमच्यासाठी..' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे.
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे आणि सगळेच आपल्या जोडीदारासाठी काहीना काही खास करत आहेत. अमृता फडणवीस यांनी देखील या व्हॅलेंटाईन वीकमध्ये एका छानशा लाल ड्रेसमध्ये फोटोशूट करत सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.