दिल्लीतील सिंधू बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामध्ये कोरोना पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच या परिसरात मोठ्या प्रमाणात डास आहेत. अनेक वयोवृद्ध शेतकरी या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी आंदोलनामध्ये तीन शेतक-यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असताना अनेक डाॅक्टर विनामुल्य शेतक-यांची सेवा करत आहे.
त्यातच या आंदोलनातील महिलांच्या आरोग्याबाबत डाॅक्टर सीमा अधिक लक्ष देतात. आंदोलनामध्ये आरोग्यसेवा असणे गरजेचे आहे. मात्र, सरकारी आरोग्य सेवा ना च्या बरोबर आहे. परंतु काही स्वयंसेवक स्व इच्छेने आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सिंधू बॉर्डरवर कॅम्प उभारत आहेत. डॉक्टर सीमा या सिंधू बाॅर्डरवर शेतक-यांची सेवा करत आहे.
यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्राने त्यांच्याशी संवाद साधला असता मॅक्स महाराष्ट्रला प्रतिक्रिया देताना त्या म्हटल्या-
सिंधू बॉर्डर वर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अनेक राज्यातून लोक सहभागी झालेल्या आहेत. हे माझे शेतकरी बांधव असल्याने त्यांना आरोग्या संबंधित काही अडचण आल्यास त्यावर लगेच निवारण व्हावं यासाठी आम्ही इथे कॅम्प लावत आहोत.
त्यांना शेतक-यांच्या आरोग्याची चिंता वाटते. त्या म्हणतात...
मोदीजींनी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना एकत्रित करून ठेवणं बरोबर नाहीये. एक-दोन दिवसातच त्यांनी निर्णय घ्यायला हवा होता.
आज ज्या शेतकरी बांधवांना त्यांनी रस्त्यावर थांबण्यास भाग पाडलं आहे. त्यात शेतकऱ्यांच्या प्रत्येक मताने मोदीजी आज पंतप्रधान झाले आहेत.
"केहते थे भाईयों और बहनों अच्छे दिन आयेंगे"
पण आज तेच बांधव रस्त्यावर असतानाही त्यांना दिसत नाहीत. त्यातील काही आजाराने त्रस्त आहेत. केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे.
कारण हे शेतकरी स्वतःचे हक्क मिळवण्यासाठी 'मरणे मिटने के के लिए' सुद्धा तयार आहेत.
शेतक-यांना कोरोनाची भीती कितपत?
कोरनाची महामारी सुरू असताना देखील अद्यापपर्यंत इथल्या शेतकऱ्यांना कोरोना झालेला नाही. कारण कोरोना हा फक्त एसीमध्ये बसून लक्झरी गाड्यांमध्ये फिरणाऱ्या आमदार-खासदारांनाच होतोय. शेतामध्ये रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला नाही.
महिला शेतक-यांच्या जीवाला धोका
मी एक महिला डॉक्टर असल्याने इथे आलेल्या महिलांना येणाऱ्या अडचणी मी समजू शकते बऱ्याच महिला व लहान मुलं सुद्धा लांबून आलेल्या आहेत त्यांना काही आरोग्याबाबत अडचणी आल्या तर जवळपास मेडिकल स्टोर सुद्धा नाही. मग अशा वेळेस त्यांच्यावर उपचार करणं, खूपच जास्त क्रिटिकल केस असल्यास त्वरित दवाखान्यात पोहोचवणं. या सेवा आम्ही पुरवतो आणि हे आमचं सौभाग्य आहे की आमच्या किसान बांधवांसाठी आम्ही काही सेवा पुरवू शकतो आहे.
आंदोलनात माध्यमांची भूमिका...
मी स्वत: पत्रकार असल्याने लोकांपर्यंत सत्य जावं याचा प्रयत्न नेहमीच असतो. पण अनेक मोठ्या वृत्तवाहिन्या गोदी मीडिया बनलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या विकत घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी करोडोने लोक एकत्र झालेले आहेत. त्या ठिकाणी फक्त हजार दोन हजार लोक मीडियाद्वारे दाखवले जात आहेत.
या सगळ्या गोष्टींना मात देत इथला शेतकरी मात्र, हक्क मिळाल्याशिवाय हटणार नाहीये.
"सर कटा देंगे लेकिन हम नही हटेंगे" अशी भूमिका डॉक्टर सीमा यांनी मॅक्समहाराष्ट्र शी संवाद साधताना मांडली आहे.