धावपटू भारताची सुवर्ण कन्या हिमा दास DSP पोलिस उपअधिक्षक बनली आहे. तिची आसाम पोलीसच्या उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी तिने माध्यमांशी बोलताना तिचं बालपणीचं स्वप्न साकार झालं असल्याचं सांगितलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये हिमाने देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहेत.
त्याचबरोबर तिला सामाजिक घटकांची जाणीव देखील आहे. तिने आसाममधील पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना मदतीचा हात पुढे केला होता. यावेळी तिने तिच्या महिन्याच्या वेतनातील अर्धे वेतन पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले होते.
काय म्हटलंय हिमा दासने?
'सर्वांना माहित आहे. मी काही वेगळे सांगणार नाही. शालेय जीवनापासून मला पोलीस अधिकारी बनायचे होते. हे माझ्या आईचेही स्वप्न होते. आज मला सर्व खेळामुळे मिळाले. मी राज्यात खेळाचा दर्जा सुधारण्याचे काम करेन. आसामला हरयाणाप्रमाणे क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम राज्य बनवण्याचा प्रयत्न मी करेन.'