ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांची सामाजिक कृतज्ञता निधीच्या विश्वस्तपदी निवड

Update: 2021-06-17 04:45 GMT

ज्येष्ठ पत्रकार व कथाकार प्रतिमा जोशी यांची सामाजिक कृतज्ञता निधीच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष सुभाष वारे यांनी फेसबूक पोस्ट द्वारे दिली आहे.

सुभाष वारे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये "साथी प्रतिमाताई जोशी यांचे अभिनंदन! सत्यशोधक विचारांच्या प्रसारासाठी सतत कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्र टाईम्सच्या माध्यमातून संवेदनशील पत्रकारितेचा वसा दीर्घकाळ ज्यांनी जपला अशा साथी प्रतिमाताई जोशी यांची "सामाजिक कृतज्ञता निधीच्या" विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन!" असं म्हटलं आहे.

दरम्यान, प्रतिमा जोशी यांची 'अज्ञाताचा प्रवासी' 'इराण जागा होतोय' 'जहन्नम - निवडक प्रतिमा जोशी' 'जीएल आणि तारा : धगधगता अंगार आणि रसरसता निखारा' 'दण्डकारण्य' 'शोध बाईमाणसाचा' ही पुस्तक व कथा संग्रह प्रसिध्द आहेत.

Tags:    

Similar News