यशोगाथा : कुठली जात कुठला 'पंथ' विकी म्हणते "कोरोनाने माणूसकी शिकवली"

Update: 2020-11-12 14:15 GMT

तृतीयपंथी म्हटलं की सर्वच नाकं मुरडतात.. त्यामुळे कोरोनामुळे जिथं आपल्याच माणसांजवळ जायला लोक घाबरत होती तिथं यांची काय बात.. अशा वेळी तृतीयपंथी समाजाच्या मदतीला आल्या त्या विकी शिंदे. विकी यांनी काही ओळखीच्या लोकांची मदत घेऊन मुंबईतील 700 तृतीयपंथी आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांना धान्य वाटप केलं. व त्यांना इतरही मदत पुरवली... कोरोनाने माणूसकी शिकवली असं विकी सांगतात. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.

Tags:    

Similar News