यशोगाथा : वर्दितली 'यशोदा' कविता पाटील

Update: 2020-11-12 13:45 GMT

कॉंस्टेबल कविता पाटील मुंबईतील व्हि पी रोड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कवीता या लॉकडाउन काळात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अन्नपुर्णा तर त्यांच्या मुलांच्या 'यशोदा मैया' बनल्या. या महिलांच्या उत्पन्नाचे सर्वच रस्ते बंद झालेले असताना कविता यांनी स्वखर्चातून त्यांना जेवण दिलं. या महिलांना काही समस्या निर्माण झाली तर "ताई आमचा आधार आहेत" असं या महिला सांगतात. त्यांनी दिलेल्या या भरिव योगदामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्य़ा संकट काळात आपापल्या परिने गरजूंना मदत करण्यासाठी काही रणरागिणींनी आपल्या जीवाची परवा न करता समाजकार्य केले. आपल्याकडे जे आहे त्यामधून इतरांना मदत करण्याची आपली भारतीय संस्कृती आहे. याच संस्कृतीचे पालन करत राज्यातील काही रणरागिणींनी आपापल्या क्षेत्रातील कामाच्या व्यापातून वेळ काढत गरजूंना लॉकडाऊनच्या काळात मदत केली. या महिलांच्या याच कार्याची दखल घेत मॅक्स वुमन आणि महिला व बालविकास विभागातर्फे या कोरोना रणरागिणीचा गौरव करण्यात आला. यावेळी महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते या हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन उपस्थित होत्या.

Tags:    

Similar News