नो जात नो धर्म, तामिळनाडूच्या Adv. स्नेहा ठरल्या देशातील पहिली जात धर्म मुक्त महिला

तामिळनाडू मधील स्नेहा देशातील पहिल्या जात धर्म मुक्त महिला झाल्या आहेत. त्यांच्या प्रमाणे तुम्हालाही जात मुक्त व्हायच आहे का? मग जाणून घ्या स्नेहा यांच्याकडून कसं मिळवलं जात धर्म मुक्त प्रमाणपत्र...;

Update: 2021-02-06 09:00 GMT

आपल्या देशात साधारणपणे आपल्या जाती धर्मावर लोक मोठ्या प्रमाणात प्रेम करताना दिसतात. मात्र, कोणी जर हे जात धर्म सोडून निधर्मी होत असेल तर... होय असं घडलं आहे. तामिळनाडू मधील तिरुप्पुत्तुर येथील 35 वर्षीय एम.ए. स्नेहा यांचा कोणताही जात धर्म नाही. त्यांच्या जन्मापासूनच त्यांची ना कोणती जात आहे. ना कोणता धर्म.... आता त्या जाती धर्मापासून मुक्त आहेत.

त्यांच्या जन्मदाखल्यावरील जात आणि धर्मासंबंधीचे कॉलम देखील खाली सोडण्यात आले आहेत. पेशाने वकील असलेल्या स्नेहा यांना तमिळनाडू सरकार ने एक औपचारिक प्रमाणपत्र दिलं असून त्यामध्ये स्नेहा या जाती आणि धर्मापासून मुक्त आहेत असं म्हटलं आहे. जाती धर्म मुक्त व्यक्ती म्हणून सरकारने जाहीर केलेल्या त्या भारतातील पहिल्या व्यक्ती आहेत.

या संदर्भात बोलताना स्नेहा म्हणाल्या...

मी विचार केला की, जर सरकार जात प्रमाणपत्र देऊ शकते. तर सरकार मला जात धर्मापासून मुक्त प्रमाणपत्र का देऊ शकत नाही. त्यानंतर मी त्या पद्धतीने अर्ज केला. माझं कुटूंब आता जातीच्या आणि धार्मिक ओळखीतून मुक्त झालं आहे. माझ्या कुटुंबात माझे आई वडिल, बहिणी आणि मुलींचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे आपल्या देशात धर्म आणि जातीवरुन सतत वाद दंगली पाहायला मिळतात. एखाद्याच्या नावावरून त्याची जात ठरवली जाते. धर्म ठरवला जातो. मात्र, स्नेहा आणि तिच्या पतीनं धार्मिक सलोख्याचा विचार करुन आपल्या मुलींची नाव ठेवली आहेत.

त्यांनी आपल्या मुलींची नाव ठेवताना बौद्ध, ईसाई आणि मुस्लिम संस्कृती शी निगडीत ही नाव ठेवली आहेत.. त्यांच्या मुलींची नाव अधिराई नसरीन, आदिला इरने, आरिफा जेस्सी अशी ठेवली आहेत.

स्नेहाने निवडलेल्या या नवीन पावलाचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News