राजपथवर महाराष्ट्राचा डंका, जळगावच्या समृद्धी पंतला मिळाला ऑल इंडिया परेड कमांडरचा बहुमान
प्रजाकसत्ताक दिना निमीत्त राजपथ येथ होणाऱ्या संचलनात जळगावच्या मुळजी जेठा कॉलेजची एन.सी.सी.युनिट छात्रसैनिक सिनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल पंत ही ऑल इंडिया परेड कमांडरचा बहुमान मिळाला आहे.
26 जानेवारी निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या सैन्य दलाच्या आणि एनसीसीच्या परेडकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेले असते. या परेडमध्ये सहभागी होण्याचे अनेकांच् स्वप्न असते. केवळ या परेड मध्ये सहभागी होण्याचं स्वप्न जळगावच्या समृद्धी हर्षल संत या तरुणीने पूर्ण केले. संपूर्ण भारतातून या पथसंचलनात सहभागी झालेल्या 100 एनसीसीच्या तुकडीचे समृद्धी नेतृत्व करत आहे.
यावर्षी एन सी सी महाराष्ट्र डायरेक्टरेट मधून केवळ 26 छात्र सैनिक निवडण्यात आले. अमरावती एनसीसी आणि 18 बटालियन मधून एकमेव समृद्धीची निवड झाली होती.
समृद्धी संत जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यायची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासून तिला एनसीसी आणि देशासाठी काम करायचे होते. समृद्धीची ही कामगिरी महाराष्ट्रातील मराठी तरुणींसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. 26 जानेवारीच्या होणाऱ्या पथसंचलनात सहभागी होण्यासाठी समृद्धी ही गेल्या दोन महिन्या पासून कसून सराव करत आहे.
देशाचा तिरंग्याला राजपथ वरून सॅल्युट करायचं हेच स्वप्न
समृद्धी पाटील न max woman शी बोलताना सांगितलं की, "एन.सी.सी. ज्या दिवसापासून जॉईन केलं त्या दिवसापासून राजपथ वरून देशाच्या तिरंगा ला सॅल्युट करायचं हेच स्वप्न पाहिलं आज ते प्रत्येक्षात आलं, तसच देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली यामुळं खूप अभिमान वाटत आहे. सुरवातीपासूनच खूप अवघड टप्पे पार करून मेहनत करून इथपर्यंत पोहचले याचा सार्थ अभिमान वाटतो. मेहनत आणि कष्ट केले तर ठरवलेले स्वप्न पूर्ण होत यावर विश्वास बसला."