"जान देदेंगे पर जमीन नहीं देंगे"

"जान देदेंगे पर जमीन नहीं देंगे" हे शब्द आहेत पंक्रीत कौर या बी टेक करणाऱ्या तरुणीचे. हा व्हिडीओ पाहाताना "तुम दूध मांगोगे हम खीर देंगे तुम काश्मीर मांगोगे तो हम चीर देंगे" अशी लाला ला धमकी देणारा अल्बक्ष तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिल..

Update: 2020-12-09 13:15 GMT

"तुम दूध मांगोगे हम खीर देंगे तुम काश्मीर मांगोगे तो हम चीर देंगे" असं लाला ला आव्हान देणारा माँ तुझे सलाम या चित्रपटातील अल्बक्ष म्हणजेच अरबाज खान सर्वांना माहितीच असेल. तुम्हाला वाटेल याचा इथं काय समंध? तर लोकहो जगाच्या पोशींद्यावर पाण्याचे फवारे, अश्रुधूराच्या नळकांड्या फोडण्याचे आदेश देणाऱ्या केंद्र सरकारला पंक्रीत कौर या तरुणीने असाच काहिसा दम भरला आहे.

पंजाब मधील बी टेक Computer science चं शिक्षण घेणारी पंक्रीत कौर म्हणते "माझं शिक्षण हे शेती मुळे झालं आहे. त्यामुळे मी या आंदोलनात सहभागी झाली आहे."

युवा नेतृत्व म्हणून या आंदोलनाकडे बघताना मला असं वाटतं की, "देशातला शेतकरी टिकला तर हा देश टिकेल. सरकारने आणलेल्या तीन बिलांमध्ये कुठेही शेतकरी हित दिसत नाही. यात केवळ शेतकऱ्यांचे नुकसान आणि आमचं भविष्य उद्धवस्त करण्याचा मानस आहे."

"त्यामुळे सरकारला हे बिल मागे घ्यावेचं लागेल. दिल्लीत एवढ्या मोठ्या संख्येने एकवटलेल्या शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात एकात्मतेची लढाई आधीच जिंकली आहे. त्यामुळे हतबल झालेलं सरकार आपला निर्णय बदलेल अशी अपेक्षा आहे."

मुख्य प्रवाहातील मीडिया मोदींची इमेज मेकिंग आणि मोदींच्या फायद्याचे रिपोर्ट जगासमोर दाखवत आहे. त्यांना समाजातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काही देणं घेणं पडलं नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या गोदी मीडियाला आम्ही बायकॉट केलं आहे.

"हम किसान अपनी जान दे देंगे वर जमीन नहीं" आमचं नाते या मातीशी आहे. जगाच्या कुठल्याही कोप-यांत आम्ही असलो तरी वेळप्रसंगी या मातीसाठी कशा पद्धतीने एकवटतो हे या आंदोलनातून संपूर्ण जग पाहत आहे." असं मत पंक्रीत कौर हिने मॅक्सवुमनशी बोलताना सांगितलं.

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात आत्तापर्यंत आपण पंजाबी पगड्या, लंगर आणि एकात्मतेची भावना, डौलदार पुरुष मंडळी, मोदी सरकारविरोधात ठिय्या मांडून बसलेले तरुण आपण पाहिले. परंतु या आंदोलनातील महिला फारशा माध्यमांसमोर पाहायला मिळत नाहीत असं अनेकांचं म्हणणं आहे. पण पंक्रीत कौर मात्र, या सर्वांना अपवाद आहे.



Tags:    

Similar News