महिला पोलीस निरीक्षकाचं पोलीस ठाण्यासमोर बंजारा नृत्य;दिला आगळावेगळा संदेश

Update: 2021-03-30 12:00 GMT
महिला पोलीस निरीक्षकाचं पोलीस ठाण्यासमोर बंजारा नृत्य;दिला आगळावेगळा संदेश
  • whatsapp icon

औरंगाबादमधील महिला पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांचा बंजारा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आडे यांनी पारंपरिक बंजारा वेशभूषा करुन पोलीस ठाण्याच्या समोरच बंजारा नृत्य केलं. राजश्री आडे या दौलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक आहेत. आडे यांनी बंजारा वेशभूषेत होळी साजरी करण्याचा एक आगळा वेगळा संदेश दिल्याने त्यांचं कौतुक होत आहे.

आडे यांची औरंगाबाद शहर पोलीस दलात सिंगम अधिकारी म्हणून ओळख आहे. दोन आठवड्यापूर्वी शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राजश्री आडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. यावेळी त्यांनी खैरेंना चांगलच सुनावलं होतं.

Full View


Tags:    

Similar News