एनडीएच्या परिक्षेत मुलींना मिळणार संधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय...
मानसिकता बदलण्याचा सरकारला सल्ला ...;
आज सर्वोच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान चांगलेच फटकारले. सर्वोच्च न्यायालयात आज एनडीए परीक्षेत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना वगळणे. घटनात्मकदृष्ट्या न्याय्य नाही. त्यामुळं महिलांनाही NDA मध्ये संधी देण्यात यावी. या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली.
सुनवाई दरम्यान सेनेने हा नितीगत प्रश्न असल्याचं कारण दिलं. मात्र, न्यायाधीश संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने हा निर्णय नितीगत लिंग भेदभावावर आधारीत असल्याचं सांगितलं. त्यामुळं न्यायालयाने आपल्या अंतिम आदेशात NDA च्या परिक्षेत महिलांना संधी देण्याचे निर्देश देताना मानसिकता बदलण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.
14 नोव्हेंबरला NDA ची परीक्षा होणार आहे.
संरक्षण दलामध्ये अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मुलींसाठी ही एक मोठी संधी आहे. सध्या NDA मध्ये प्रत्येक वर्षी 1800 विद्यार्थ्यांना संधी दिली जाते. 12 वी नंतर ही परीक्षा घेतली जाते. या परिक्षेला साधारण 3 लाख विद्यार्थी बसतात. वर्षातून दोन वेळेस या परिक्षेचं आयोजन केलं जातं.