का गेली मुंबईत वीज?

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागांमध्ये वीज गायब झाली.;

Update: 2020-10-12 05:30 GMT

टाटा पॉवर च्या ग्रीड मध्ये बिघाड झाल्यामुळे मुबंई तसंच परिसरातील वीज पुरवठा आज खंडीत झाला. यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून रेल्वेसेवांपर्यंत अनेक गोष्टी प्रभावित झाल्या. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागांमध्ये वीज गायब झाली.

आयलँडींग असूनही वीज गायब

देशातील ग्रीड फेल झाल्यानंतरही मुंबईतील वीज जाणार नाही अशी व्यवस्था आहे. याला आयलँडींग म्हणतात. अशी व्यवस्था असतानाही मुंबईचा वीजपुरवठा खंडीत झाला. ही व्यवस्था टाटा पॉवरकडे आहे, मात्र टाटा पॉवरच्याच इनकमिंग लाइन मध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबईला फटका बसला.

Tags:    

Similar News