अखेर समजलंच ; PM MODI यांच्या ब्लॉगमधला Abbas कोण आहे व सध्या काय करतो?

पंतप्रधान मोदींनी आपल्या ब्लॉगमध्ये Abbas यांचा उल्लेख केल्यानंतर ते ट्रेन्डिंगमध्ये आले आहेत. अब्बास कोण आहेत आणि कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे.;

Update: 2022-06-19 14:13 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM MODI) यांनी आपल्या आईच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त लिहिलेला ब्लॉग (BLOG )यामध्ये चर्चेत आहे. पण या ब्लॉगमधील एका उल्लेखामुळे नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावर सध्या ट्रोल केले जाते आहे. सध्या ट्विटरवर Abbas ट्रेन्डिंगमध्ये आहे. कोण आहे हा अब्बास, तो सध्या काय करतोय अशा स्वरुपाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नरेंद्र मोदी यांच्या ब्लॉगमध्ये काय?

मोदी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये आईबद्दल लिहिताना आपला लहानपणीचा मित्र अब्बास (Abbas) यांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, "मां हमेशा दूसरों को खुश देखकर खुश रहा करती हैं। घर में जगह भले कम हो लेकिन उनका दिल बहुत बड़ा है। हमारे घर से थोड़ी दूर पर एक गांव था जिसमें मेरे पिताजी के बहुत करीबी दोस्त रहा करते थे। उनका बेटा था अब्बास। दोस्त की असमय मृत्यु के बाद पिताजी अब्बास को हमारे घर ही ले आए थे। एक तरह से अब्बास हमारे घर में ही रहकर पढ़ा। हम सभी बच्चों की तरह मां अब्बास की भी बहुत देखभाल करती थीं। ईद पर मां, अब्बास के लिए उसकी पसंद के पकवान बनाती थीं। त्योहारों के समय आसपास के कुछ बच्चे हमारे यहां ही आकर खाना खाते थे। उन्हें भी मेरी मां के हाथ का बनाया खाना बहुत पसंद था।"

अब्बास सध्या काय करतो?

यानंतर सोशल मीडियावर अब्बास कोण आहे, अशा स्वरुपाचे प्रश्न उपस्थित होत आहेत. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ पंकजभाई यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की "अब्बास मियांजीभाई रामसादा मोमीन हे मेहसाना मधील केसिम्पा या गावात राहत होते. ते आमच्या परिवाराचे एक सदस्यच होते. मोदी यांचे सगळ्यात लहान भाऊ पंकजभाई आणि अब्बास हे वर्गमित्र होते. अब्बास यांचे वडील आणि मोदींचे वडील मित्र होते. "त्यांच्या गावात माध्यमिक शाळा नव्हती. त्यामुळे प्राथमिक शिक्षणानंतर अब्बास यांची शाळा सुटू नये म्हणून माझ्या वडीलांनी अब्बासला शिक्षणासाठी आमच्याकडे ठेवा याकरीता अब्बासच्या वडिलांनी तयार केले. अब्बासने ८ आणि ९ वे शिक्षण आमच्याकडे राहून पूर्ण केले" असे पंकजभाई यांनी सांगितले. "अब्बास हे आता ६४ वर्षांचे आहेत. गुजरात सरकारमध्ये क्लास २ दर्जाचे अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले आहेत आणि गेल्याच आठवड्यात ते आपल्या मुलाकडे सिडनीला रवाना झाले आहेत" असे पंकजभाई यांनी सांगितले. एवढेच नाही तर सर्व सण आम्ही एकत्रित साजरे करायचो असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

यानंतर सोशल मीडियावर काही मिम्सही व्हायरल झाले आहेत. यामध्ये काहींनी अब्बास कोण आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. तर काहींनी अभिनेता अक्षयकुमार यालाही ट्रोल केले आहे.

तर नरुंदर नावाच्या एका ट्विटर युजरने अब्बास २००२ नंतर कुठे केला, असा खोचक सवाल विचारला आहे.

Tags:    

Similar News