स्वाती बापट कुठं गेली?

Update: 2020-07-13 03:06 GMT

फेसबूकवर मुलींच्या नावाने अनेक फेक प्रोफाइल असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. असंच अकाउंट म्हणजे स्वाती बापट. या संदर्भात कोमल कुंभार यांनी स्वाती बापट हे अकाउंट फेक असल्याची माहिती दिली आहे.

 

काय आहे कोमल कुंभार यांची फेसबूक पोस्ट?

स्वाती बापट. हल्ली तीन-चार महिन्यांपासून हे अकाऊंट फेसबुकवर धुमाकूळ घालत होतं. सामान्य प्रशासन विभागात काम करणारी पोरगी. तिचे व्हिडिओज यायचे बरेचसे. एकदम देखणी आणि सुंदर मुलगी. पोरं जाम मागे लागलेली तिच्या. कुणी इन्बॉक्समध्ये जायचं, कुणी वॉलवरच छान छान बोलायचं. बघितलं की छान वाटायचं तिला. एकेका व्हिडिओला आणि फोटोला शेकडो लाइक्स.

आज कळलंय की टिकटॉकवरून कुठल्यातरी एका राजस्थानी मुलीचे व्हिडिओ इथे स्वाती/ स्वीटी बापटच्या नावाने अपलोड केले जात होते. आणि हे सगळं एक मुलगा करत होता. पर्दाफाश झाल्यावर हे अकाऊंट डिलीट झालेलं आहे.

फेसबुकवरच्या तिच्या प्रेमात पडलेल्या तमाम पोरांच्या दुःखात मी सहभागी आहे. हजारो हृदयं पायाखाली तुडवून गेली ना?

ज्यांना अकाऊंटचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं. नंबरवर फोन करू नका रे. तो पण बंदच असणार आहे.

[gallery ids="15125,15126"]

Similar News