उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी महात्मा गांधी तुलना राखी सावंत हिच्याशी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता यावर राखी सावंत ने ह्रदय नारायण दीक्षित यांना प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हटलंय होतं हृदय नारायण दीक्षित यांनी?
उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये भाजप प्रबुद्ध वर्ग संमेलनामध्ये विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांची जीभ घसरली होती. भाषण देताना, मी 6 हजार पुस्तकं वाचली आहे आणि त्याचे विश्लेषणही केलं आहे. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करताना ते सांगतात की गांधी कमी कपडे घालायचे. त्यांना देश बापू बोलत असे. परंतु असं नाही की कमी कपडे घालून कुणी बौद्धिक होतं. कमी कपडे घातले किंवा उतरविल्यानं जर कुणी मोठं बनत असतं. तर आज राखी सावंत महात्मा गांधी यांच्या पेक्षाही मोठी झाली असती.
त्यांच्या या विधानाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली. त्यानंतर सोशल मीडियावर होणाऱ्या टीका लक्षात घेता दीक्षित यांनी एक ट्विट करत केलेल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं होतं. या ट्विटमध्ये, माझ्या वक्तव्याची जी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जात आहे. ती क्लिप संदर्भहीन आहे. खरंतर हा व्हिडिओ भाषणाचा फक्त एक भाग आहे.
उन्नावच्या प्रबुद्ध संमेलनात संचालकाने माझी ओळख करून देताना मला एक प्रबुद्ध लेखक म्हणून संबोधलं आहे. यामुळे मी म्हणालो की, काही पुस्तकं आणि लेख लिहून कुणीही ज्ञानी होत नाही. महात्मा गांधी कमी कपडे घालायचे. देशाने त्यांना बापू म्हटलं पण याचा अर्थ असा नाही की राखी सावंतही गांधीजी होतील. असं स्पष्टीकरण दीक्षित यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं होतं.
यावर राखी सावंत यांनी खाजगी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
सन्मानीय जे अध्यक्ष आहेत. यांच्यावर मला एक गाणं आठवतं. मला नाही माहिती माझ्यामागे सर्व भारतातील मंत्री, राजकीय लोक निरमा, सर्फ, घेऊन हात धुऊन का मागे पडले आहेत? असं म्हणत खास तिच्या शैलीत राखी का अंग अंग तडाखा इसलिए युपी का स्पिकर मुझपर भडका असं म्हणत तिने निशाणा साधला आहे. मला या लोकांवर हसू येतं. देशासाठी यांना बोलायचं आहे. यांना देशासाठी काम करायचं आहे. त्यांनी त्यांचं काम सोडून माझ्या शरीरावर लक्ष देऊ नये. मी कपडे घालते की नाही. किंवा मी निर्वस्त्र राहते. याकडे डोळे लावू नये. अध्यक्ष साहेब तुम्ही मला निर्वस्त्र कधी पाहिलं. ती पुढे म्हणाली हृदय नारायण दीक्षित हे तिच्या आजोबांच्या वयाचे आहेत, त्यामुळे त्यांनी आपल्या नाती संदर्भात बोलताना विचार करायला हवा. अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कोण आहेत हृदय नारायण दीक्षित? Who is Hriday Narayan Dixit
हृदयनारायण दीक्षित यांचा जन्म उत्तर प्रदेशच्या उन्नाव मध्ये झाला आहे. ते साहित्यिक, लेखक, पत्रकार आणि राजकीय नेते आहेत. भाजपचे वरिष्ठ नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. सध्या ते उत्तर प्रदेशच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत.