"खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की..." कंगना रणौतच्या रांगेत विक्रम गोखले!

Update: 2021-11-14 11:47 GMT

अभिनेत्री कंगना रणौतला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. कंगनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ती या व्हिडीओमध्ये टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हणते..

आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते.

कंगना रणौतच्या रांगेत अजून एका अभिनेत्याची भर पडली आहे. विक्रम गोखले. आज विक्रम गोखले यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

"खरंय, कंगना रणौत जे म्हणालेली आहे, ते की ते भीक मागूनच मिळालेलं आहे. यावर मी सहमत आहे. हे दिलेलं गेलं आहे बरं का. हे ज्या योद्ध्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही त्यांनी. आपल्या देशाचे हे लोक ब्रिटिशांविरुद्ध उभे राहत आहेत, हे बघून सुद्धा त्यांना फाशीपासून वाचवलं नाही, असेही लोक केंद्रीय राजकारणात होते. भरपूर वाचलेलं आहे मी. ज्यांनी बलिदान दिलं त्यांचा हा अवमान नाही का?"

देश कधीही हिरवा होणार नाही...

लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबर ला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे.

असा सवालही विक्रम गोखले यांनी केला आहे. तसंच यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आणि शिवसेना व भाजपा एकत्र आली तर बरं होईल. असा सल्ला देखील दिला आहे.

Tags:    

Similar News