राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूर तसेच भुस्खलनामुळे कोकण , सांगली , कोल्हापूर, सातारा या भागाला मोठा फटका बसला आहे. या सर्व भागांत अनेक राजकीय नेते पाहणी दौरे करत आहेत. अशात शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी महाड शहराची पाहणी करत तेथील पूरग्रस्तांची विचारपूस केली.
महाडमध्ये तर अतिवृष्टीमुळे महापुर व दरडीमुळे जनजीवन संपुर्णत: विस्कळीत झालं आहे. पूर बाधीतांच्या घरातील सर्व साहित्य पूरात वाहून गेल. यामुळे लोकांना खायला अन्न व पाणी देखील उपलब्ध नव्हतं. पूर्णपणे शहर आणि आजूबाजूच्या गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनेकडून मोठ्या प्रमाणात पूरग्रस्त लोकांना मदत केली जात आहे.
शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी बुधवारी महाड शहराची पाहणी करत पूरग्रस्तांची विचारपूस केली. त्यांच्यासोबत स्थानिक आमदार भरत गोगावले उपस्थित होते. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य पाकीटांचे वाटप करण्यात आले. "आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. उद्धवजी ठाकरे सारखे अत्यंत कार्यकुशल व सक्षम असे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत हे आपलं भाग्य आहे", असं मत व्यक्त करत त्यांनी पूरग्रस्तांना मानसिक आधार दिला.