मै महाराष्ट्र की बेटी हू, उर्मिला मातोंडकर ने गोदी मीडियाला सुनावले...
उर्मिला मातोंडकर ने असे घेतले ऑफिस, केला खुलासा;
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ने ऑफिस खरेदी केलं आहे. या संदर्भात काही माध्यमांनी वृत्त दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी अर्धवट माहितीच्या आधारे बातमी देणाऱ्या माध्यमांना चांगलेच ख़डे बोल सुनावले आहे. त्यांनी या संदर्भात ट्विटर व्हिडीओ ट्विट केला आहे.
या संदर्भात विरोधकांनी आणि काही माध्यमांनी चुकीची माहिती पसरवली, चुकीच्या बातम्या चालवल्या. लॉकडाऊनच्या काळात आपण अंधेरीच्या डी.एन. नगर भागातील आपला एक फ्लॅट विकला. त्याच पैशातून आपण हे कार्यालय खरेदी केलं आहे.
असं म्हणत त्यांनी गोदी मीडिया आणि विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.