वाढलेले यूरिक ॲसिड :कारणे , लक्षणे आणि आयुर्वेदिक उपचार. यूरिक ॲसिड चे रक्तातील पातळी वाढणे ही आरोग्य समस्या सध्या अनेकांना भेडसावत आहे प्युरिन नावाचा एक घटक काही अन्नपदार्थात असतो शरीरात प्युरीनचे विघटन झाल्यानंतर त्यातून यूरिक ॲसिड ची निर्मिती होते यूरिक ॲसिडचे योग्य प्रमाण शरीरातील काही कार्यांसाठी आवश्यक असते परंतु जर हे प्रमाण वाढले तर त्यामुळे शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात विशेषतः सांधेदुखी ज्याला गाऊट असे म्हटले जाते आयुर्वेदात याचे साधर्म्य वात रक्त या आजाराशी दिसते तसेच सांध्यांवर सूज ऍसिडिटी किडनी स्टोन इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात हे वाढलेले यूरिक ॲसिड शरीराबाहेर उत्सर्जन होणे अपेक्षित असते योग्य प्रकारे जर हे उत्सर्जन झाले नाही तर रक्तातील यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढते.
आयुर्वेदानुसार रक्तातील यूरिक ॲसिड चे प्रमाण वाढते तेव्हा वातदोष व रक्त यांचे असंतुलन झालेले असते यामुळे वात प्रकोप व रक्तदृष्टी यांची एकत्र लक्षणे शरीरात दिसून येतात. याची अनेक कारणे आहेत प्रामुख्याने बदललेला आहार विशेषतः मांसाहार मटन तसेच मद्यपान अति खारट आंबट तिखट मसालेदार उष्ण पदार्थांचे सेवन सतत बाहेरचे खाणे आंबवलेले पदार्थ खाणे विरुद्ध आहार घेणे अजीर्ण व अपचन झाल्यावरही खाणे रुक्ष व कोरडे पदार्थ जास्त खाणे तसेच रात्री जागरण दिवसा झोपणे सतत प्रवास सततचे बैठे काम अपुरी झोप मानसिक ताण तणाव क्रोध राग चिडचिड या कारणांमुळे वातप्रकोपरोक्त दृष्टी होऊन वात रक्त म्हणजेच गावठा आजार होतो यामध्ये यूरिक ॲसिड चे प्रमाण खूप जास्त होते आता याची लक्षणे पाहूया विशेषता सांध्यांच्या ठिकाणी सूज वेदना आरक्तवर्णता तसेच सांध्यांच्या ठिकाणी दाह होणे जळजळ होणे आणि अचानक सुरू होणारी सांधेदुखी मुख्यता पर्व संधी म्हणजे हातापायाच्या बोटांचे सांधे दुखणे तिथे सूज येणे हे दिसून येतात तसंच ऍसिडिटी होणे सतत जळजळ होणे आणि किडनी स्टोन यासारखेही प्रकार दिसून येतात आयुर्वेदात यासाठी खूप छान उपाय सांगितलेले आहेत सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे हेतू टाळणे ज्या कारणांनी हा आजार होतोय ती दूर करणे म्हणून पहिला बदल हा आहारात करावा लागतो त्यासाठी मांसाहार मटण बंद करावे,मूग सोडून इतर सर्व कडधान्य, सोया मिल्क ,आल्मण्ड मिल्क,बाहेरचे खाणे दही, आंबट खारट वृक्ष मसालेदार पदार्थ आंबवलेले बेकरीचे पदार्थ , ओटस् आहारातून वर्ज्य करावे मद्यपानही पूर्ण बंद करावे त्या ऐवजी घरी बनवलेले ताजे गरम जेवण करावे यात हिरव्या पालेभाज्या फळे विशेषता कोथिंबीर पुदिना यांचा समावेश करावा. हिरवे मूग, मूगाची डाळ ,गाईचे दूध तूप लोणी यांचा मुबलक वापर करावा , भिजवलेल्या काळ्या मनुका आहारात असावे.
वजन नेहमी नियंत्रित ठेवावे जास्त वजन वाढले स्थूलता आली तर हा त्रास वाढू शकतो. रोज पुरेशी झोप घ्यावी रात्री जागरण व दिवसा झोपणे टाळावे रात्रीच्या शांत झोपेत शरीर स्वतःला दुरुस्त करत असते त्यामुळे शरीरातील दोषांचे संतुलन राखले जाते. मानसिक ताण-तणाव दूर ठेवावे कारण जेव्हा तुम्ही तणावग्रस्त असता तेव्हा तुमच्या मेंदूकडून विशिष्ट हार्मोन्स स्त्रवतात त्यामुळे नैसर्गिक चयापचय क्रियेत अडथळा येतो आणि त्रिदोषांचे असंतुलन होते.
तणावमुक्त स्ट्रेस फ्री राहण्यासाठी ध्यानधारणा प्राणायाम योगासन यांचा उपयोग करावा योगासनांमध्ये सूक्ष्म व्यायाम पुरखालचाली पवन मुक्तासन भुजंगासन धनुरासन सर्वांगासन सूर्यनमस्कार इत्यादी अवश्य करावे.. पंचकर्मातील विरेचन बस्ती रक्तमोक्षण ,विद्ध कर्म तसेच अभ्यंग पत्रपोट्टली ,पिंडस्वेद, शिरोधारा हे उपचार वैद्यांच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखीखालीच करावेत.
घरी सहचरादी तेल, नारायण तेल इत्यादी लावून अभ्यंग करू शकता मात्र सांध्यांना सूज असेल तर अभंग करू नये .
यासाठी काही घरगुती उपाय पाहूया
१.आठवड्यातून एकदा पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण तुपा सह घ्यावे किंवा एरंडेल घ्यावे
२.रात्रीचे जेवण हलके असावे ज्वारीच्या भाकरीत एरंडेल टाकून भाकरी करून खावी
३.त्रिफळा चूर्ण व हळद मिक्स करून तुपा सह घ्यावे
४.गुळवेलीचा काढा यामध्ये उपयुक्त आहे
५.कोथिंबीरचा ताजा रस तसेच धने भिजवून त्याचे पाणी प्यावे औषधांमध्ये अमृता गुग्गुळ ,अमृतारिष्ट कोकीलाक्ष ,महामंजिष्ठादी काढा यांचा उत्तम उपयोग होतो परंतु यांचा वापर वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा .
योग्य व संतुलित आहार योग्य व्यायाम योगासने प्राणायाम ध्यानधारणा पुरेशी झोप यामुळे आपण वाढलेल्या यूरिक ॲसिडचे प्रमाण कमी करू शकतो व मुळात ते वाढू नये यासाठी जीवनशैलीतील हे बदल सहाय्यकारी ठरतात.
डॉ लीना बोरुडे
आयुर्वेदाचार्य
फोन 9511805298