मामी तुम्ही पक्क्या पागल झालात, अमृता फडणवीस यांच्या विरोधातील प्रतिक्रीयांची पातळी ढासळली
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दर्जा सोडून टीका केल्यानंतर नेटकऱ्यांनी आता त्यांना टार्गेट केलं आहे. पण एखाद्या नेत्याला अथवा महिला नेतृत्वाला असं टार्गेट करण कितपत योग्य आहे.
शनिवारी संध्याकाळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर उध्वस्त ठरकी म्हणत टीका केली होती. यानंतर त्यांना काही तासांतच ते ट्वीट डिलीट करावं लागलं होतं. आता त्याच शब्दांमध्ये त्यांना आणखी एक ट्विट केलं आहे फक्त आता त्यामध्ये त्यांनी नेटकऱ्यांना काही पर्याय दिले आहेत. ते ट्विट काय आहे आणि नेटकऱ्यांनी ते पर्याय निवडले आहेत की आणखी काही वेगळ्या शब्दांत प्रतिक्रीया दिल्या आहेत हे आता आपण पाहूयात.
अमृता फडणवीस या ह्या ना त्या मार्गाने चर्चेत कायम असतात. शनिवारी डिलिट केलेल्या ट्विट नंतर त्या खुप चर्चेत आल्या आणि रविवारी त्यांना पुन्हा त्याच आशयाचं ट्विट केलं. डिलीट केलेल्या ट्विटमधील फक्त दोन अक्षरं गाळून तेच ट्विट पुन्हा ट्विट केलं. या ट्विट मध्ये त्यांनी आणखी काही पर्याय देखील दिले आहेत. त्यांनी त्यांच्य़ा ट्विट मध्ये, "थोडक्यात उत्तर धावे; (उत्तर दिलेल्या विकल्पांमधूनच एक किव्हा सर्व पर्याय निवडून धावे) उद्वस्थ ठ_ _ ने कुठे नेवुन ठेवला आहे #Maharashtra आमचा ? 1. वसूली च्या ताब्यात २. विकृत अघाडीच्या ताब्यात ३. लोड shedding च्या ताब्यात ४. Traffic Jam आणि अव्यवस्थेच्या ताब्यात ५. गुंडांच्या ताब्यात" असं म्हटलं आहे.
यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करत, "एक पर्याय लिहायला विसरलेच ; ६. बायकोच्या भावाच्या ताब्यात ...", असं म्हटलं आहे. पुर्णतः त्यांनी त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरून मुख्य मंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रीया आलेल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका केलीये तर काहींनी त्यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रीया दिल्या आहेत. रूमानी221 या वापरकर्त्याने अमृता फडणवीस यांना उध्दव ठाकरेंचा एक फोटो पोस्ट करत काही प्रश्न विचारले आहेत. "अमृता, तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, माननीय रश्मी ठाकरे या सर्व मुलांसोबत दिसतात का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतायत का? वास्तव पाहण्यासाठी डोळे उघडा.", असं म्हटलं आहे.
तर अजित सुरेखा अण्णासाहेब शिंदे या वापरकर्त्याने थोडक्यात उत्तरे द्या म्हणत प्रश्न विचारत काही पर्याय दिले आहेत. ते म्हणतायत, "थोडक्यात उत्तर द्या, महाराष्ट्रात मामी पेक्षा कोणाचा आवाज बरा आहे 1. गाढव 2. रानु मंडलं 3. धिंच्याक पूजा"
त्यांच्या या ट्विटवर अजित पाटील या वापरकर्त्याने, " मामीच गाढव आहे", असं लिहीलं आहे.
अपर्णा पवार या वापरकर्तीने थेट वैयक्तिक प्रतिक्रीया देत "खालील प्रश्नांची विस्तृत स्वरूपात उत्तर द्यावेत. 1) विवेक म्हणजे काय???? 2) अलिबाग मध्ये काय घडल आहे??? 3) महाराष्ट्राची घाण कोकिळा म्हणून कुणाला ओळखतात?? 4) टरबूज कुणाला म्हणतात???", असे प्रश्न विचारले आहेत.
ज्ञानदेव देवराम पाटील शिर्डी या वापरकर्त्याने देवेंद्र फ़डणवीस यांचा नवनीत राणा यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून, "तू बस प्रश्न विचारत लोकांना, हा बघ काय करतोय इकडे!", असं म्हटलं आहे.
अशोक कोठेकर या वापरकर्त्याने, "थोडक्यात उत्तर धावे???? मामी तुम्ही पक्क्या पागल झालात ; @Dev_Fadnavis साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर मामीला योग्य मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवा अन्यथा गोष्ट हातातून निघून गेल्यावर काहीही उपयोग नाही", असं म्हटलं आहे.
अशा अनेक वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्या प्रतिक्रीया देखील आल्या आहेत. पण एका महिलेवर मतभेद असले तरी अशाप्रकारच्या प्रतिक्रीया देणं कितपत योग्य आहे याचा जरा आपण विचार करायला हवा.