आता ट्विटरवर चुकीची माहिती लगेच ओळखता येणार...

Update: 2021-11-22 02:11 GMT

खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर रोखण्यासाठी ट्विटरने एक वॉर्निंग नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर वापरकर्त्यांना वॉर्निंग दिसेल. ट्विटरने जागतिक स्तरावर हे नवीन फिचर जारी केले आहे. चुकीची माहिती ओळखण्यासाठी ट्विटरने केशरी आणि लाल रंगांचा समावेश केला आहे. पहिल्या लेव्हलचा रंग निळा ठेवण्यात आला होता, जो ट्विटरच्या रंगासारखा होता, त्यामुळे आता या दोन रंगांचा समावेश करण्यात आला आहे.

योग्य सामग्री प्रदान करण्यात देखील फिचर मदत करेल

2020 च्या US अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विटरवरून चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. हे लक्षात घेऊन कंपनी दीर्घकाळापासून यावर काम करत होती. तज्ञांच्या मते, नोटिफिकेशनमुळे वापरकर्त्यांना योग्य सामग्री प्रदान करण्यात मदत करेल. याच्या मदतीने चुकीची माहिती, फोटो आणि व्हिडिओही सहज काढून टाकले जातील. यासोबतच ट्विटर कोरोनाशी संबंधित चुकीचा डेटा आणि दिशाभूल करणारी माहिती देखील नोटिफाईड करेल.

Tags:    

Similar News