सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना या गोष्टी काळाची गरज – चिन्मयी सुमित

Update: 2021-12-09 06:41 GMT

सामाजिक परिवर्तनासाठी एका हाती संघर्ष आणि एका हाती रचना या दोन्ही गोष्टींची आज नितांत गरज आहे असं संबोधन प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी आज महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात केलं. राष्ट्र सेवा दल,मुंबईने या कार्यक्राचं आयोजन केलं होतं.

२१ जुलैच्या महापुरात महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खूप नुकसान झालं होतं. कॉलेजातील रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेस राष्ट्र सेवा दल मुंबईच्या वतीने साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम चिन्मयी सुमीत यांच्या हस्ते पार पडला.

या प्रसंगी बोलताना अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाल्या, "आज मी या महाविद्यालयात आले आणि माझे मन मराठवाड्यातील औरंगाबाद मधील पी. ई.सोसायटीच्या डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या आठवणीत गेले. माझी आई डॉ.आंबेडकर कॉलेज मध्ये मानसशास्त्र विभागप्रमुख होती. याच मातीत माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझं बालपण समृध्द झाले. आपल्या भावना आणि विचार सतत एकत्रितपणे जपण्याचे वातावरण मला तिथे मिळाले त्याबद्द्ल कृतज्ञता आणि अभिमान वाटतो. माझी आई नामांतराच्या आंदोलनात तुरुंगात गेलेली आहे. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी चवदार तळ्याशी जावून नतमस्तक झाले. मी जे समतेचे विचार मानते ते विचार आचरणात यायला हवेत अशी माझी धारणा आहे. आजकालच्या वातावरणात खूप अस्वस्थता दाटून येते मात्र राष्ट्र सेवा दला सारख्या संघटना, संस्था समाजासाठी असं काही काम करताना पाहिले की हेच वातावरण खूपच आश्वासक वाटायला लागते असेही चिन्मयी सुमीत यांनी सांगितले.

या कार्यक्रमा नंतर महाड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक १ आणि शाळा क्रमांक २ मध्ये संगणक, वाचनालयासाठी कपाटे आणि इतर शैक्षणिक साहित्य अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि डॉ.संजय मंगला गोपाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी गाणी, गोष्टी आणि गप्पांमधून मुलांशी संवाद साधण्यात आला. करोनाकाळात बंद असलेली आणि पूराच्या पाण्याचे सावट असलेली शाळा यानिमित्ताने मुलांच्या किलबिलाटाने आणि गाण्यांच्या आवाजाने गजबजून गेली.

या प्रसंगी विचारमंचावर मुंबईतील व्ही.जे. टी.आय.चे निवृत्त असोसिएट डीन आणि सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष डॉ.संजय मंगला गोपाळ, कॉलेजचे प्राचार्य डॉ.धनाजी गुरव, राष्ट्र सेवा दल मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, सानेगुरूजी राष्ट्रीय स्मारकाच्या विश्वस्त सिरत सातपुते, प्रा.दीपक क्षीरसागर उपस्थित होते.

Full View

Tags:    

Similar News