मोठा निर्णय: १० वी आणि १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, कधी होणार परीक्षा?

Update: 2021-04-12 10:16 GMT

ज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील MPSC ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला होता. त्यानंतर आता १० आणि १२ वीच्या परीक्षा जून महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाणार होती. मात्र, कोरोनाच्या परिस्थितीने पालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचं वातावरण होतं. त्यानंतर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.


या संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट केलं असून परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. पाहा काय म्हटलंय वर्षा गायकवाड यांनी

Tags:    

Similar News