तानाशाही नहीं चलेगी चे नारे, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

Update: 2022-07-18 07:21 GMT
तानाशाही नहीं चलेगी चे नारे, राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
  • whatsapp icon

सदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज सुरू करण्यापूर्वी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी विधानसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी राज्यसभा आणि लोकसभेवर आलेल्या नव्या खासदारांना शपथ देण्यात आली.

राज्यसभेतही श्रद्धांजली वाहिली

राज्यसभेत, सभापती नायडू यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे, यूएईचे अध्यक्ष शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान, संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा आणि इतरांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर कामकाजाला सर्र्वात झाली पण विरोधकांनी गोंधळ केल्यानंतर राज्यसभेचे कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. विरोधकांनी सभागृत तानशाही नाही चलेगी, मोदी जीएसटी- महागाई आटा चावल दूध दही की महंगाई नहीं चलेगी अशा घोषणा देत मोठा गदारोळ केला त्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी दिवसभरासाठी सभागृह स्थगित केले.. नक्की काय घडलं सभागृहात पहा..

Full View

Tags:    

Similar News