UPSC निकालांमध्ये मुलींची बाजी, पहिल्या दहात ६ मुलीच!

Update: 2022-05-30 10:40 GMT

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर केला. परीक्षेला बसलेले उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकालात श्रुती शर्मा संपुर्ण देशात अव्वल ठरली आहे.


यंदाच्या UPSC परीक्षेच्या निकालात मुलींचाच वरचष्मा आहे. पहिल्या क्रमांकावर श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यानंतर गामिनी सिंगला हिला तिसरा क्रमांक मिळाला आहे. चौथ्या क्रमांकावर ऐश्वर्या वर्मा आणि उत्कर्ष द्विवेदी याला पाचवा क्रमांक मिळाला आहे. म्हणजे पहिल्या पाचात चार तर मुलीच आहेत.

यक्ष चौधरी सहाव्या क्रमांकावर राहिला. तर सम्यक जैन याने सातवा क्रमांक पटकावला. आठव्या क्रमांकावर इशिता राठी, तर नवव्या क्रमांकावर प्रीतम कुमार आणि दहावा क्रमांकावर हरकिरत सिंग रंधावा हे आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी UPSC परीक्षेत भाग घेतात, त्यापैकी काही मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. UPSC ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. यावर्षी UPSC आयोगाने ५ एप्रिल ते २६ मे दरम्यान मुलाखती घेतल्या होत्या.

UPSC द्वारे नियुक्तीसाठी एकूण ६८५ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये २४४ सामान्य, ७३ EWS, २०३ OBC, १०५ SC आणि ६० ST प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. UPSC द्वारे नागरी सेवा परीक्षा दरवर्षी घेतल्या जातात. पूर्व, मुख्य आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांनंतर या परीक्षेचा निकाल जाहीर केला जातो. जे निकालात यशस्वी होतात ते IAS, IFS इत्यादी अधिकारी म्हणुन रूजू होतात.

Tags:    

Similar News