शोभना आशा: एका ऑटो रिक्षाचालकाची मुलगी ते क्रिकेटची स्टार्

शनिवारी वुमन प्रीमियर लीगचा युपी वारियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना सर्वांच्या भुवया उंचवणारा ठरला. याचे कारण या सामन्यात शोभना आशा हीने घेतलेल्या 5 विकेट्स. त्रिवेंद्रमच्या रस्त्यांवरून क्रिकेटच्या मैदानावर, शोभना आशा हीच्या प्रेरणादायी कथेचा हा प्रवास जाणून घ्या;

Update: 2024-02-25 06:43 GMT

शोभना आशाला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने वुमन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात 10 लाख रुपयांना संघात घेतले होते. शोभनाच्या रूपाने आरसीबीला एक उत्तम गोलंदाजी तसेच अष्टपैलू खेळाडू मिळाला होता.

आशा शोभनाचा जन्म 01 जानेवारी 1991 ला केरळमधील त्रिवेंद्रम येथे झाला. वडील ऑटो ड्रायव्हर असल्याने घराची जिम्मेदारी वडिलांवर होती, घरचा सर्व खर्च त्यांच्याच कमाईतून येत असे. आशा हालाकीच्या परिस्थितित पण त्यांनी आपल्या मुलीच्या क्रिकेटर होण्याच्या मार्गात आर्थिक अडचण येऊ दिली नाही. म्हणून शोभना इंडिया A, केरळ, रेल्वे आणि अनेक संघांमधून खेळण्याचा अनुभव घेत वुमन प्रीमियर लीग मध्ये पोहोचली

गेल्या वर्षी आरसीबीकडून खेळताना तिने 5 सामन्यात 5 बळी घेतल्या. तिला बहुतांश सामन्यांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली नाही, पण आता शोभनाने पहिल्याच सामन्यात 5 बळी घेत इतिहास रचला आहे.

17व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर श्वेता शेरावत, चौथ्या चेंडूवर ग्रेस हॅरिस आणि सहाव्या चेंडूवर किरण नवगिरेला बाद करून तिने सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या खिशात खेचून आणला.

17 व्या ओव्हरपूर्वी यूपी वॉरियर्स सामन्यात होती. 16व्या षटकापर्यंत 3 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या. 4 षटकात विजयासाठी 32 धावांची गरज होती. हा सामना युपी वॉरियर्सला सहज जिंकता आला असता, पण शोभनाच्या घातक आणि तूफान गोलंदाजीसमोर यूपी वॉरियर्स संघाची घसरण सुरू झाली. आणि आरसीबीने शेवटच्या षटकात हा सामना 2 धावांनी जिंकला.

या 5 विकेट्ससह शोभना आशा WPL मध्ये 5 बळी घेणारी जगातील चौथी गोलंदाज ठरली आहे. सर्वात आधी अमेरिकेच्या तारा नॉरिसने गेल्या वर्षी 5 विकेट घेत इतिहास रचला होता. डब्ल्यूपीएलमध्ये 5 विकेट घेणारी ती पहिली गोलंदाज होती. यासोबतच गेल्या वर्षी गुजरातच्या मॅरिझान कॅपने 15 धावांत 5 बळी घेतले होते. तर किम गर्थने 36 धावांत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता या यादीत शोभना आशा यांचे नाव जोडले गेले आहे.

शोभना आशा हे नाव क्रिकेटच्या इतिहासात कोरलं जाणार आहे, योर्करच्या धडाकेबाज तडक्याप्रमाणेच! या प्रेरणादायी कथेतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आर्थिक अडचणींवर मात करून स्वप्नांचा पाठलाग करणं हेच शोभना यांच्या यशाचं खरं रहस्य आहे. आम्ही शोभना यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. 

Tags:    

Similar News