शिवसेना आमदाराच्या पत्नीची आत्महत्या, कारण अस्पष्ट

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Update: 2022-04-18 03:17 GMT

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शिवसेनेचे कुर्ला विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्याबरोबरच पोलिसांनी शव ताब्यात घेतले असून आत्महत्येचा तपास सुरू आहे.

रजनी कुडाळकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचे कारण स्पष्ट झाले नाही. तर पोलिस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना फोनवर गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्याबरोबरच त्यांनी पुढील तपासाला सुरूवात केली.

कुर्ला नेहरू नगर पोलिस स्टेशनच्या भागात आमदार मंगेश कुडाळकर यांचे घर आहे. तर सध्या त्यांच्या घरी मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहुन तपास करत आहेत. मात्र शिवसेना आमदाराच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

रजनी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वाद हे एक महत्वाचे कारण असल्याचा चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नाही. याबरोबरच गेल्या काही महिन्यांपुर्वी रजनी यांच्या मुलाचं अपघाती निधन झाले होते. त्यानंतर रजनी कुडाळकर यादेखील खचल्या होत्या. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अजून समोर आले नाही.

दरम्यान शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मंगेश कुडाळकर यांना फोन करून त्यांचे सांत्वन केले. तर याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही या घटनेची माहिती दिली आहे, असे मिलिंद नार्वेकर यांनी सांगितले.

Tags:    

Similar News