मुंबईत नववर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी, कलम 144ही लागू

Update: 2021-12-30 06:22 GMT

एका दिवसात अडीच हजारांहून अधिक कोरोना बाधित झाल्यामुळे मुंबईत नवीन वर्षाचा उत्सव साजरा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेऊन 7 जानेवारीपर्यंत संपूर्ण शहरात कलम 144 लागू केले आहे. आता एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी असणार आहे. यासोबतच शहरातील सर्व हॉटेल, बार, क्लब, पब आणि रेस्टॉरंटमध्ये नवीन वर्षाच्या पार्ट्या आणि सेलिब्रेशनवरही बंदी घालण्यात आली आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रसाराचा वेग वाढला..

गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 2 हजार 510 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण बाधित रुग्णांची संख्या 7 लाख 75 हजार 808 झाली आहे. या कालावधीत राज्यात 251 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. यातून बरे होणाऱ्यांची संख्या ७ लाख ४८ हजार ७८८ झाली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृताचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह एकूण मृतांची संख्या 16 हजार 375 वर पोहोचली आहे. मंगळवारी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 377 वर पोहोचला असून एका दिवसापूर्वीचा 809 चा आकडा ओलांडला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 60 सक्रिय रुग्ण आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोना केसेस वाढत आहेत. धारावीत गेल्या २४ तासांत १७ नवीन रुग्ण आढळले आहेत. याशिवाय दादरमध्ये 32 आणि माहीमसारख्या गजबजलेल्या भागात 29 नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी ८ एप्रिल रोजी धारावीत सर्वाधिक ९९ रुग्ण आढळले होते.

Tags:    

Similar News