स्वातंत्र्याविषयी बोलताना जीभ घसरलेल्या प्रवक्ताकडे भाजपचा कानाडोळा..

Update: 2021-10-31 05:44 GMT

भाजपा युवा मोर्चाच्या प्रवक्त्या रुची पाठक यांनी ब्रिटिशांकडून नेहरू आणि गांधींनी 99 वर्षाच्या भाडेकरारावर स्वातंत्र्य मिळवले असून देशाला अजूनही पूर्णता स्वातंत्र्य मिळालेले नाही असे विधान केले होते. एका खासगी वेब वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर खरंतर सर्वत्र खळबळ उडाली. सर्वच स्तरातून त्यांच्या या विधानाचा निषेध केला जातोय. असे जरी असले तरीही भाजपने मात्र या प्रकरणावर चकार शब्द सुद्धा काढलेला नाहीये. या प्रकरणावर भाजपने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

रुची पाठक काय म्हणाल्या होत्या..

'ब्रिटिशांकडून नेहरू आणि गांधींनी 99 वर्षाच्या भाडेकरारावर स्वातंत्र्य मिळवले असून देशाला अजूनही पूर्णता स्वातंत्र्य मिळालेले नाही. देशात स्वातंत्र्य लढा, लढला जात होता मात्र ब्रिटनची राणी भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार नव्हती. मग नेहरूंनी संविधानाला साक्षी मानून नव्हे तर ब्रिटनच्या राणीच्या वतीने पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.' असं पाठक यांनी म्हंटल आहे. दोन दिवसांपूर्वी त्या 'लल्लन टॉप' या वेबवृत्तसंकेतस्थळाच्या आयोजित एका परिसंवादाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी खाजगीकरण या विषयावर चर्चा सत्र आयोजित केले होते आणि याच कार्यक्रमादरम्यान गौरव जैन जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत यांच्या मुद्द्यांना प्रत्युत्तर देताना रुची पाठक यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे.


या वादग्रस्त निधानानंतर रुची पाठक यांनी काय स्पष्टीकरण दिलंय..

तर या वादग्रस्त विधानानंतर रुची पाठक यांनी 'बोलण्याच्या ओघात हे विधान केलं असल्याचं म्हटलं आहे. अशी विधाने करून देशवासियांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. देशाच्या संविधानावर आक्षेपही घ्यायचा नव्हता. ही विधाने पक्षाच्यावतीने नव्हे तर वैयक्तिक आहेत. ही माझी माहिती कदाचित चुकीचे असू शकेल. मी काही ब्लॉग आणि स्वदेशीचा आग्रह धरणारे राजीव दीक्षित यांच्या विचारांचा आधार घेतला.' असे स्पष्टीकरण त्यांनी यांनी दिले आहे.




 


Tags:    

Similar News