Rubika Liyakat vs MIM : नाहीतर पत्रकारिता सोडून देईन

Update: 2021-09-12 02:15 GMT

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होण्यासाठी आणखी काही वेळ शिल्लक आहे, परंतु राजकीय पक्ष आत्तापासूनच तयारीला लागले आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा पक्ष AIMIM देखील या निवडणुकीत आपली ताकद दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. अलीकडेच, ओवैसी उत्तर प्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी भाजपसह अनेक राजकीय पक्षांवर टीका केली. तर याच मुद्द्यावर टीव्हीवरील चर्चेदरम्यान, जेव्हा AIMIM चे प्रवक्ते असीम वकार यांनी शोच्या अँकर रुबिका लियाकत यांना सांगितले की, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पत्रकार विकत घेतात. तर यावर रुबिका लियाकत यांनी चैलेंज देत पत्रकारिता सोडण्याची अट AIMIM च्या प्रवक्त्यासमोर ठेवली आणि म्हणाल्या की, जर तुम्ही बरोबर ठरलात तर मी तुम्हाला पत्रकारिता करतांना दिसणार नाही.

झालं असं की, एबीपी न्यूजवर आयोजित केलेल्या डिबेट शो दरम्यान, अँकर रुबिका लियाकत यांनी AIMIM चे प्रवक्ते असीम वकार यांना प्रश्न विचारला की, हा पक्ष बरोबर आहे आणि हा पक्ष चुकीचा आहे हे मुस्लिमांना सांगणारे तुम्ही कोण आहात. जर तुम्हाला हे योग्य वाटत असेल तर तुम्ही तेलंगणातील सर्व जागा का लढवत नाही, तुम्ही तेथील मुस्लिमांना का जागृत करत नाही आणि तेथे मुस्लिम मुख्यमंत्री का बनवत नाहीत?

अँकर रुबिका लियाकत यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना असीम वकार म्हणाले की, " तुम्ही खूप छान बोलत आहात. आमची इच्छा आहे की, तुम्ही केवळ अँकरच नसावे, तर तुम्ही एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीही व्हावे. आमच्यासोबत या आणि आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी लढू. असीम वकारच्या या उत्तरावर अँकर रुबिका लियाकत हसायला लागल्या आणि म्हणाल्या की, मी सध्या ज्या पदावर आहे तेथून मुख्यमंत्र्याला आणि सामान्य माणसालाही प्रश्न विचारू शकतो. यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही".

अँकरच्या या उत्तरावर असीम वकारनेही प्रत्युत्तर देत म्हटले की, "तुम्ही जिथे आहात तेथून मुख्यमंत्री खरेदी करू शकत नाही. पण मुख्यमंत्री तुम्हाला खरेदी करू शकतात, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पत्रकार विकत घेऊ शकतात". एआयएमआयएम प्रवक्त्याच्या या उत्तराला उत्तर देताना अँकर रुबिका लियाकत म्हणाल्या की, "कोणीही कोणालाही खरेदी करू शकत नाही. पुढे, रुबिका लियाकत असीम वकार यांना चैलेंज देत म्हणाल्या की, एखांद्या मुख्यमंत्रीने पत्रकाराला विकत घेतल्याच सिद्ध करून दाखवावे. जर तुम्ही हे सिद्ध करून दाखवले तर मी पत्रकारिता सोडून देईल, आणि सिद्ध केलं नाही तर तुम्ही राजकारण सोडताल का ?"

यावर एआयएमआयएमचे प्रवक्ते असीम वकार म्हणाले की, मी राजकारण का सोडू, माझा दावा चुकीचा ठरणार नाही. तसेच मी तुम्हाला म्हणत नाही, माझं असं म्हणणे आहे की, मुख्यमंत्री यांना कुणीही विकत घेऊ शकत नाही पण ते कुणालाही विकत घेऊ शकतात. डिबेट शोमध्ये झालेलं हे संभाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

Tags:    

Similar News