Royal Enfield ने Super Meteor-650 बाईकची किंमत वाढवली...

Update: 2023-05-13 02:01 GMT
Royal Enfield ने Super Meteor-650 बाईकची किंमत वाढवली...
  • whatsapp icon

Royal Enfield ने भारतीय बाजारपेठेतील फ्लॅगशिप क्रूझर सुपर मेटियर-650 बाईकची किंमत वाढवली आहे. कंपनीने ही बाईक यावर्षी जानेवारी महिन्यात लॉन्च केली होती. कंपनीने तिन्ही व्हेरियंटच्या किमतीत 6 हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. Royal Enfield ने फक्त किंमत वाढवली आहे पण बाईक मध्ये कोणताही बदल केलेला नाही. बाईकच्या किमतीत वाढ तसेच डिझाईन, ब्रेकिंग, सस्पेन्शन आणि अॅक्सेसरीज बद्दल जाणून द्यायचे असले तर अँपूर्ण व्हिडिओ बघा..

आता Royal Enfield Super Meteor-650 च्या Astral व्हेरिएंटची किंमत 3,54,398 रुपये करण्यात आली आहे, जी 3,48,900 रुपयांना लॉन्च करण्यात आली होती. तर, रु.3,63,900 मध्ये सादर केलेला इंटरस्टेलर प्रकार आता रु.3,69,622 मध्ये उपलब्ध आहे. तर, हाय-एंड सेलेस्टियल व्हेरिएंट आता रु.3,84,845 मध्ये उपलब्ध आहे, जो रु.3,78,900 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. सर्व किंमती चेन्नईच्या एक्स-शोरूम आहेत...

Super Meteor-650 ला Meteor-350 प्रमाणेच क्रूझर डिझाइन देण्यात आले आहे. बाजूच्या पॅनल्सच्या डिझाइनमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे आणि तो मॅट ब्लॅक रंगाचा आहे. बाइक पूर्णपणे फूट-फॉरवर्ड फूट कंट्रोल्स, कमी स्कॅलॉप्ड सीट आणि रुंद पुल-बॅक हँडलबारसह येते.

Tags:    

Similar News