"रेणू शर्मावर सत्तेचा दबाब", धनंजय मुंडेच्या विरोधात तृप्ती देसाई मैदानात

Update: 2021-01-22 10:27 GMT

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बालात्काराची तक्रार रेणू शर्मा या महिलेने परत घेतल्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तृप्ती देसाई यांनी रेणू शर्मा आणि तिच्या वकिलांवर धनंजय मुंडे यांनी दबाव तंत्र वापरून तक्रार मागे घेण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे.

तृप्ती देसाई यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी या व्हिडिओत 'सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणू शर्मा या महिलेने मोठ्या हिम्मतीनं अत्याचाराच्या संधर्भात तक्रार दाखल केली होती, परंतू पोलीसांनी सुरूवातीला तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचं राजकारण करण्यात आलं. आणि रेणू शर्मा नावाची महिलाच कशा पध्दतीनं चुकीची आहे, तिला बदनाम करण्यास सुरूवात झाली. ती कशी चारित्र्यहीन आहे, ब्लॅकमेलर आहे, अशा पध्दतीनं संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.

रेणू शर्मा आणि तिच्या वकीलांवर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. त्यांना पाठींबा देणाऱ्यांना देखील धमक्या देण्याचा आणि ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला, आणि शेवटी आज रेणू शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे तक्रार मागे घ्यावी लागली. खऱ्या अर्थानं आज राज्यामध्ये आज हाच संदेश जातोय की जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री आणि प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात जेव्हा तुम्ही आवाज उचलचा तेव्हा तुमचा आवाज दाबला जातो. सत्तेचा वापर करून सत्ताधाऱ्यांकडून तुमचा प्रयत्न हाणून पाडला जातो. अशा पध्दतीचा संदेश गेला.'

तृप्ती देसाई येवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टिका करत 'विवाहबाह्य संबंधांना पाठींबा देणाऱ्या समर्थकांचा आणि हे प्रकरण सत्तेचा वापर करून दाबणाऱ्या मंत्र्याचा आज हा विजय झाला. परंतू जरी त्यांना वाटत असेल त्यांचा हा विजय आहे. रेणू शर्माने माघार घेतली. आपल्याला दिलासा मिळाला. आपण जिंकलो. असं जर वाटत असेल तर नक्कीच धनंजय मुंडेजी आपण आमच्या सर्वांच्या मनातून कायमचे उतरलात. हा सत्तेचा माज आणि जो दबाब आणून केस मागे घ्यायला लावली ही अत्यंत निंदनीय बाब आहे.'

आज सकाळीच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर तिच्या समर्थानासाठी उतरलेल्या भाजपनेच तिच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतल्यामुळे समाजात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

Full View
Tags:    

Similar News