पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी महागाई वाढलेली आहे, सरकार यावर काहीच करत नसल्याची टीका होत असताना आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करत असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क लीटरमागे ८ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ६ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यामुळे पेट्रोल लिटरमागे साडे नऊ रुपयांनी स्वस्त होणार आहे. तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
7/12 We are reducing the Central excise duty on Petrol by ₹ 8 per litre and on Diesel by ₹ 6 per litre.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022
This will reduce the price of petrol by ₹ 9.5 per litre and of Diesel by ₹ 7 per litre.
It will have revenue implication of around ₹ 1 lakh crore/year for the government.
या निर्णयामुळे केंद्र सरकारवर दरवर्षी १ लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार असल्याची माहितीही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. ज्या राज्य सरकारांनी आपापले कर आतापर्यंत कमी केलेले नाहीत, त्यांनीही राज्यातील कर कमी करावे असे आवाहन निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
9/12 Also, this year, we will give a subsidy of ₹ 200 per gas cylinder (upto 12 cylinders) to over 9 crore beneficiaries of Pradhan Mantri Ujjwala Yojana. This will help our mothers and sisters. This will have a revenue implication of around ₹ 6100 crore a year. #Ujjwala
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) May 21, 2022
याचबरोबर उज्ज्वला योजनेत ज्या महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे, त्यांना वर्षाला १२ सिलेंडरसाठी २०० रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचीही घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारने सिमेंट तसेत प्लास्टीक आणि लोखंड यांच्या किंमती कमी करण्यासाठीही काही निर्णय घेतल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या महागाईमुळे केंद्र सरकारवर जोरदार टीका होते आहे. विरोधकांनीही देशभरात विविध ठिकाणी महागाईविरोधात आंदोलनं सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.