महात्मा फुले यांच्या पुण्यस्मरणा दिवशी रसिका अगाशे यांचा अभिनव उपक्रम
आज महात्मा फुले यांचे पुण्यस्मरण आहे. आजच्या दिवशी जागोजागी पुस्तकं वाचली पाहिजेत या हेतूने आपल्या घरातच एक छोटं वाचनालय सुरू करण्याचा अभिनव उपक्रम रसिका अगाशे यांनी मुंबईतील कांदिवली या ठिकाणी केला आहे.
आज महात्मा फुले यांचे पुण्यस्मरण आहे. आजच्या दिवशी जागोजागी पुस्तकं वाचली पाहिजेत या हेतूने आपल्या घरातच एक छोटं वाचनालय सुरू करण्याचा अभिनव उपक्रम प्रसिध्द लेखिका, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री रसिका अगाशे यांनी मुंबईतील कांदिवली या ठिकाणी केला आहे.
महाराष्ट्राला पुरोगामी राष्ट्र म्हणून ओळखलं जात. याच पुरोगामीत्वाचा पाया छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घातला. या सगळ्याची पायाभरणी केली ती म्हणजे महात्मा फुले यांनी. तत्कालीन समाजातील कर्मठ पुराणमतवाद्यांचा विरोध पत्करून त्यांनी अनेक समाजसुधारणा केल्या.
महात्मा फुलेंनी भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया घालत मुलींसाठी 1884 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. सावित्रीबाई यांना स्वतः शिक्षण दिले व त्यांना पहिल्या शिक्षिका बनवलं. विद्येविना मति गेली | मतिविना नीति गेली|| नीतिविना गति गेली | गतिविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले|| आशा शब्दात त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.
पण आज जर आपण पाहिलं तर मागील दोन वर्ष्याच्या कोरोना काळात अनेक मुले शिक्षणापासून दुरावली. ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचा प्रयत्न झाला. पण यामध्ये मोबाईल, कॉम्प्युटर, टॅब आशा स्मार्टफोनच्या जगात वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. त्यामुळे आता पुन्हा वाचनाचे महत्व मुलांना समजावे त्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून महात्मा फुले यांच्या पुण्यस्मरणा दिवशी रसिका आगाशे यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक छोटीशी लायब्ररी सुरू केली. #foodforthought अस म्हणत त्यांनी ट्विटरवर या वाचनालयाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी हा छोटासा पण एक अभिनव असा उपक्रम राबला आहे. अशा प्रकारे कुणाला छोटी लायब्ररी सुरू करायची असेल तर आम्ही मदत करू असे देखील त्यांनी म्हटले आहे.