रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा वंदे भारत ट्रेनने मुंबईकडे प्रवास
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रवास केला. ते दोघे कोकण दौरा संपवून मुंबईला परतत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज वंदे भारत एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रवास केला. ते दोघे कोकण दौरा संपवून मुंबईला परतत होते.
वंदे भारत एक्सप्रेस VANDE BHARAT EXPRESS ही भारतातील पहिली सेमी-हाई-स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन २०१९ मध्ये सुरू करण्यात आली होती. वंदे भारत एक्सप्रेस अनेक प्रमुख शहरांना जोडते आणि प्रवाशांना वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देते. याच ट्रेन ने उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे प्रवास करत होते. या राजकारणातील प्रेमळ जोडप्याचे फोटो सोशल मिडिया वर त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते शेअर करत आहेत.
ठाकरे यांनी खेड रेल्वे स्टेशनवरून वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवेश केला. प्रवासा दरम्यान त्यांनी इतर प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. अनेक प्रवाशांनी उद्धव ठाकरे UDDHAV THACKREY यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी सर्वांशी प्रेमाने सेल्फी काढले. मराठी भाषिक प्रवाशांसोबतच इतर भाषिक प्रवाशांनीही ठाकरे यांच्याशी संवाद साधला.
या प्रवासा दरम्यान उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यांनी कोकण दौरा आणि तेथील लोकांशी झालेल्या भेटींबद्दल माहिती दिली. तसेच, राज्यातील विविध घडामोडी आणि राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले.
उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरेही RASHMI THACKREY या प्रवासात उपस्थित होत्या. त्यांनीही प्रवाशांशी संवाद साधला आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या.
ठाकरे यांच्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवासाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेक लोकांनी या प्रवासाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.