माणुसकीची आस असलेल्या तृतीयपंथी समाजाला आजही संघर्ष करावा लागत आहे. करोनाच्या काळात त्यांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. जेवणासाठी कसरत करणाऱ्या १३० तृतीयपंथ्यांसोबत माणुसकीचा धागा जपत समाजसेवकाने रक्षाबंधन साजरी केले.
[gallery data-size="medium" bgs_gallery_type="slider" ids="15802,15801,15800"]
हे ही वाचा
मुंबई महापालिकेचे सर्व खासगी कार्यालयांना आवाहन
‘एक राखी कोरोना योध्द्यांसाठी…’
[gallery data-size="medium" bgs_gallery_type="slider" ids="15798,15797,15796"]
१३०० किलो गहू आणि १३०० किलो तांदूळ देत त्यांनी आपुलकी, प्रेम, जगण्याचा हक्क देणारा "YOU MATTER" हा संदेश देणारे कप केक ही दिले.
तृतीयपंथी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोनात अजूनही हवा तसा बदल झालेला नाही. करोनामुळे तृतीयपंथी समाजावर दुर्लक्ष होत होते. त्यांच्या जगण्याला महत्व आहे म्हणून "YOU MATTER" हा मेसेज देत विपुल गुंदेशांनी रक्षाबंधन साजरी केले. प्रत्येकी १० किलो गहू आणि १० किलो तांदूळ आणि कप केक देऊन त्यांनी तृतीयपंथी समाजाची मदत केली आहे.
[gallery data-size="medium" bgs_gallery_type="slider" ids="15803,15799,15795"]
पुण्याच्या विपुल प्रकाश गुंदेशा या सामाजिक कार्यकर्त्यांने १३० तृतीयपंथ्यांना धान्याचा पुरवठा करून त्यांच्या रक्षणासाठी पाऊल उचलेले आहे. रमोला दीदी ( तृतीयपंथी गट प्रमुख ) यांच्याकडून राखी बांधली आहे. विपुल गुंदेशांनी तृतीयपंथ्यांना मदत करा असे आवाहन केले आहे. अनेकांनी मदतीस पुढे यावे असे ते म्हणाले आहेत.