कोरोनावर मात करुन आलेल्या बहिणीचं नाचो स्टाइल स्वागत, तुम्ही पाहिलंय का?
पुण्यातील सलोनी सातपूते या तरुणीने बहिण स्नेहल कोरोनावर मात करुन घरी परतली. यावेळी सलोनीने, हट जा रे छोकरे….गाण्यावर डान्स करुन आपल्या बहिणीचं स्वागत केलंय. सलोनीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
दरम्यान सलोनीने कठिण काळात सकारात्मक कसं रहायचं याचं एक उदाहरण घालून दिलं आहे. कारण, सलोनीच्या घरातील 5 जणांना कोरोनाची लागण झाली होती. एकट्या सलोनीचा अहवाल निगेटीव्ह आला. महत्वाची गोष्ट म्हणजे पाचही जणं कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.