'मोदींच्या सुरक्षा रक्षकावर मुली घायाळ…' हा कामांडो सोशल मीडियावर होतोय व्हायरल...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षारक्षक असलेला कमांडो सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अनेक मुलींनी तर यांना लग्नाची मागणीच घातली आहे. आणि आता लग्नासाठी ‘मी-की-तू’ वरून सोशलमीडियाचं मैदान चांगलंच तापलं आहे. अनेक महिला त्याचं कौतुक करतायत तर तगडा-जवान अशा या कमांडोंची तारिफ करणाऱ्या महिलांना ट्रोल ही केलं गेलंय.

Update: 2022-01-12 06:34 GMT

सध्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या मुद्यांवरून मोठा गदारोळ चालू आहे. समाजमाध्यमांवर लोक वेगवेगळी मतं व्यक्त करतायत. या सगळ्या गदारोळात समाजमाध्यमांवर आणखीन एक गोष्ट जोरदार व्हायरल होत आहे ती म्हणजे SPG चा ब्लॅक सुट मधील कमांडो. तुम्ही नरेंद्र मोदी यांना पंजाब दौऱ्यादरम्यान ज्या ठिकाणी त्यांना 15 ते 20 मिनिटं थांबून परतावं लागलं त्या ठिकाणच्या एक फोटो पहिला असेल.


 तर या फोटोतील जो काळ्या रंगाचा सूट घालून हातात बंदूक घेऊन SPG चा कमांडो दिसतो आहे ना..हा त्याचीच सध्या जोरदार चर्चा आहे..अनेक महिलांनी या कमांडोची तारिफ करणारे ट्वीट लिहिलेत तर फेसबुक वर ही हा कमांडो चांगलाच व्हायरल होतोय. तगडा-जवान अशा या कमांडोंची तारिफ करणाऱ्या महिलांना ट्रोल ही केलं गेलंय. आता तर या कमांडोची जात ही लोकांना कळलीय. जाट समाज या ट्वीटर हँडल ने हा कमांडो जाट असल्याचं म्हटलं आहे. @JAT_SAMAAJ या ट्वीटर हँडल ने जहाँ मॅटर बडे होते है, वहाँ जाट खडे होते है असं ट्वीट केलं आहे.

अनेक मुलींनी तर या सुरक्षारक्षकाला लग्नाची मागणीच घातली आहे. आणि आता लग्नासाठी 'मी-की-तू' वरून सोशलमीडियाचं मैदान चांगलंच तापलं आहे.


 



 

पोलिसांच्या मधून वाघासारखा जाणारा कमांडो म्हणून कोणी तारिफ करतंय तर कुणी या कमांडो वर घायाळ झालंय

तर कुणी या कमांडोच्या चेहऱ्याच्या जागी स्वतःचा चेहरा लावून मुलींना क्रश साठी आमंत्रित करतंय.

कुणी या कमांडोची भीती दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खतरनाक आहेत याची धमकीच सोशल मिडीयावर देत आहे.

कमांडोवरील कमेंट वरून सोशल मिडीयावर दंगाच सुरूय यातील काही महत्वाचे ट्वीट इथे देत आहोत.

इतकी सुरक्षा व्यवस्था असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात आलं नाही त्यामुळे एक महिलेने तर जर्मनीच्या पहिल्या महिला चान्सलर अँजेला मार्केल यांचा एका दुकानात एकट्या फिरतानाचा फोटो शेअर करत ''कुठलेही ब्लॅक कॅट कमांडो सोबत न घेता एका सर्वसामान्य व्यक्ती सारख्या देशाचे प्रमुख लोकांमध्ये जाऊ शकतात. तुम्ही काय कर्म केले आहेत यावर लोक व्यक्त होतात.'' असं म्हंटल आहे.




 


Tags:    

Similar News