पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबईत सर्वाधिक 85-85 पैशांची उसळी आली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 117.57 रुपये आणि डिझेलची किंमत 101.57 रुपये झाली आहे. 12 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही 10वी वाढ आहे. पाच राज्यांच्या निवडणूकांपाठोपाठ देशातील पेट्रोल, डिझेलसह घरगुती आणि व्यवसायिक गॅसच्या किंमतीही वाढताना दिसत आहेत. त्यातच गेल्या 12 दिवसात 10 वेळा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे गेल्या अकरा दिवसात इंधनाचे दर जवळपाम 7 रुपयांनी वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाढत्या पेट्रोल डिझेलच्या दरांचा सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडत आहे. त्यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे.
काल व्यवसायिक ग्रा गॅस सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ
काल व्यवसायिक ग्रा गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे व्यवसायिक ग्राहकांना गॅस भरण्यासाठी मुंबईत 1 हजार 955 रुपयांऐवजी 2 हजार 205 रुपये मोजावे लागणार आहेत.
याआधी व्यवसायिक गॅसच्या किंमतीमधील चढउतार पहायला मिळत आहे. ऑक्टोबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत व्यवसायिक गॅसच्या किंमतीमध्ये 170 रुपयांनी वाढ झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2022 ला गॅसच्या दरात घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा गॅसच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा भार सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे.काल शुक्रवारी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे. या 19 किलोग्रॅम सिलेंडरची किंमत आता 2 हजार 553 रुपये होणार आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
22 मार्च रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला होता. दिल्लीत घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने त्याचा परिणाम हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर दिसून येणार आहे. याचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरही होणार आहे, कारण खर्च वाढल्याने बाहेरील खाद्यपदार्थांच्या किमती वाढणे साहजिक आहे.